नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०२४-२५ साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवले आहे. देशातील सुमारे ७ कोटी नोकरदारांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.
‘ईपीएफओ’ने २०२४-२५ मध्ये २.०५ लाख कोटी रुपयांच्या ५.०८ कोटी दाव्यांवर प्रक्रिया केली. ही संख्या २०२३-२४ मधील ४.४५ कोटी दाव्यांपेक्षा अधिक आहे. २०२३-२४ साठी ८.२५ टक्के व्याजदर हा १.०७ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नावर आधारित होता. जो १३ लाख कोटी रुपयांच्या मुळ रकमेवरील आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. २०२२-२३ मध्ये भविष्य निर्वाह निधीवर ८.१५ टक्के व्याजदर होता, जो ११.०२ लाख कोटी रुपयांच्या मुळ रकमेवर ९१,१५१.६६ कोटींच्या उत्पन्नावर जाहीर करण्यात आला होता. भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरांत चढ-उतार दिसून आले आहेत. २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के, २०१९-२० मध्ये ८.५ टक्के आणि २०२१-२२ मध्ये ८.१ टक्के व्याजदर राहिला असून त्यात घसरणीचा कल दिसून आला. ईपीएफचा सर्वाधिक व्याजदर २०१५-१६ मध्ये ८.८ टक्के आणि २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये ८.७५ टक्के एवढा होता. २०२४-२५ साठी सध्याचा व्याजदर हा ८.२५ टक्के आहे. २०२३-२४ मध्ये व्याजदर ८.२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. जो २०२२-२३ मध्ये ८.१५ टक्के एवढा होता.
दर महिन्याला पगारदार कर्मचारी त्यांच्या कमाईच्या १२ टक्के त्यांच्या EPF खात्यात योगदान देतात. दरम्यान, नियोक्ता ३.६७ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा करतात. उर्वरित ८.३३ टक्के कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये (ईपीएस) वितरीत केली जाते. नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (ईडीएलआय ) खात्यात ०.५० टक्के योगदान देखील देतो
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…