कॉफीप्रेमींना धक्का! Cafe Coffee Day होणार बंद?

मुंबई : व्ही.जी. सिद्धार्थ यांनी १९९६ मध्ये 'कॅफे कॉफी डे' (Cafe Coffee Day) या नावाची कंपनी सुरु केली. सुरुवातीला कर्नाटकातील बंगळुरू येथे सुरु केलेले हे सीसीडी आउटलेट कालांतराने देशभरात पसरले. १५ वर्षात देशभरात १,००० हून अधिक कॅफे उघडून ते भारतातील इतर शहरांमध्येही वेगाने विस्तारले. मात्र काही कालावधीनंतर देशातील मोठी कॉफी चेन कंपनी आर्थिक संकटात सापडत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून ही कंपनी बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कॉफी प्रेमींना याचा धक्का बसला आहे.



कॅफे कॉफी डे'ची (CCD) मूळ कंपनी सीडीईएल बऱ्याच काळापासून अडचणीत आहे. २१ फेब्रुवारीच्या अंतिम मुदतीत सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश जारी करण्यात अयशस्वी झाल्यानंतर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. कंपनीवर २,२२८ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे गेल्यापासून कंपनीवर दबाव आहे. तथापि, एनसीएलटीने अंतिम निर्णय न घेतल्याने, कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. आता गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट क्षेत्राचे डोळे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या पुढील आदेशावर लागले आहेत. (Cafe Coffee Day)



२८.४ कोटी रुपयांचा थकबाकीचा दावा


नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) च्या बेंगळुरू खंडपीठाने आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेडची याचिका स्वीकारली. यानंतर सीडीएल विरुद्ध दिवाळखोरीची कारवाई ८ ऑगस्ट २०२४ रोजी सुरू झाली. यामध्ये २८.४ कोटी रुपयांचा थकबाकीचा दावा करण्यात आला. कर्जबाजारी कंपनीच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी एका आयआरपीची नियुक्ती करण्यात आली. निलंबित मंडळाने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिल्यामुळे NCLT ने १४ ऑगस्ट २०२४ रोजी कारवाईला स्थगिती दिली होती.


यानंतर, आयडीबीआय टीएसएलने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. त्यानंतर ३१ जानेवारी २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एनसीएलटीच्या चेन्नई खंडपीठाला २१ फेब्रुवारीपर्यंत अपील निकाली काढण्याचे निर्देश दिले. जर अपील वेळेच्या मर्यादेत निकाली काढले नाही तर सीडीईएलची दिवाळखोरी प्रक्रिया सुरू होईल, असा निर्णय न्यायालयाने दिला. त्याच्यावरील बंदी आपोआप संपेल. म्हणूनच २२ फेब्रुवारी २०२५ च्या दिलेल्या अंतिम मुदतीनंतर कंपनीवर CIRP प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा विचार करण्यात आला.


दरम्यान, कॉफी डे ग्रुपची मूळ कंपनी CDEL ही कॅफे कॉफी डे आउटलेट चेन व्यतिरिक्त रिसॉर्ट कन्सल्टन्सी सेवा आणि कॉफी बीन ट्रेडिंग चालवते. जुलै २०१९ मध्ये संस्थापक बीजी सिद्धार्थ यांच्या निधनापासून कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तथापि, कंपनी तिच्या मालमत्तेची विक्री आणि पुनर्रचना करून कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. (Cafe Coffee Day)

Comments
Add Comment

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार दिल्लीत अनधिकृत मशिदीवर मनपाची कारवाई, दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एमसीडी अर्थात दिल्ली मनपाने तुर्कमान गेट परिसरातील

Petrol Diesel Price : गुड न्यूज! लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरणार; जाणून घ्या सविस्तर अपडेट

मुंबई : देशात सध्या महागाईचा आलेख सातत्याने उंचावत असून सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक

अमेरिकन व्हिसा पाहिजे, तर साडेतेरा लाख जमा करा !

व्हिसा नाकारला गेला तर पैसे परत नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या व्हिसासाठी काही देशांतील नागरिकांना अर्ज

उत्तर प्रदेशमध्ये १५.४४ कोटी मतदारांची सखोल तपासणी

आता उरलेत १२ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये मतदारांची विशेष सखोल चौकशी

सोनिया गांधी रुग्णालयात

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Hydrabad Crime : अमेरिकेत हैदराबादच्या लेकीची निर्घृण हत्या; संशयित माजी रूममेट भारतात पळाला, तामिळनाडूत अटक

हैदराबाद : अमेरिकेतील मेरीलँड राज्यात डेटा आणि स्ट्रॅटेजी ॲनालिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या निकिता गोडिशला (वय