शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दत्तात्रय गाडेची कुंडली उघड

पुणे : स्वारगेट एसटी डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार पीडित तरुणीने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा चेहरा ओळखला आहे. पण घटनास्थळावरुन पसार झालेला आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप पोलिसांच्या हाती आलेला नाही. पोलिसांनी आरोपीचा फोटो प्रसिद्ध केला आहे. पाठोपाठ आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती आणि त्याच्या विषयीची इतर महिती पण पोलिसांनी मिळवली आहे.



आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर राजकीय वरदहस्त आहे. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिरुर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चारचाकी गाडीत बसवायचा आणि लुबाडायचा. मात्र एका महिलेच्या सतर्कतेमुळे त्याला पोलिसांनी पकडलं. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपीचे गावात पक्क्या बांधकामातील पत्र्याचे छत असलेले घर आहे. तसेच वडिलोपार्जित तीन एकर शेतजमीन देखील आहे. आई-वडील शेतात काम करतात. तसेच त्याला एक भाऊ असून, पत्नी, लहान मुले आहेत. दत्तात्रय कामधंदा करत नव्हता. झटपट भरपूर पैसे कमावण्यासाठी त्याने चोरी करणे, लुबाडणे हे प्रकार सुरू केले.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय गाडे याने २०१९ मध्ये कर्ज काढून एक वाहन विकत घेतले. या वाहनातून तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत होता. ज्या महिलेने जास्त दागिने अंगावर घातले आहेत अशाच महिलेला तो वाहनातून लिफ्ट देत होता. त्यांना आडमार्गला नेऊन चाकूने धाक दाखवून दागिने लुबाडून पळून जात असे.

दत्तात्रय गाडे गुणाट गावाच्या तंटामुक्ती निवडणुकीसाठी उभा होता. या निवडणुकीत त्याचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीच्या काळात दत्तात्रय गाडेने एका नेत्यासाठी कार्यकर्ता म्हणून काम केले होते. नेत्यासोबतचे गाडेचे काही फोटो व्हायरल झाले होते. दत्तात्रय गाडेने २०२० मध्ये करे घाटात लुटालूट केली होती. त्याला एका दरोड्याप्रकरणी शिक्षा झाली होती. दत्तात्रय गाडे विरोधात शिक्रापूर येथे दोन तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव आणि कोतवाली पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांतील त्याच्या विरोधातले खटले प्रलंबित असल्याने तो मोकाट फिरत होता.

स्वारगेट एसटी डेपोमध्ये नेमके काय घडले ?

स्वारगेट एसटी डेपोमध्ये एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या आणि सर्व दिवे बंद असलेल्या रिकाम्या शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली. एका तरुणीला दिशाभूल करणारी माहिती देऊन बसमध्ये पाठवण्यात आले. ही तरुणी बसमध्ये शिरताच वेगाने आरोपी बसमध्ये आला, त्याने बसचा दरवाजा आतून बंद केला आणि तरुणीवर बलात्कार केला. पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. कायम गर्दी असलेल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये ही घटना घडली त्यावेळी कोणाच्याही लक्षात आले नाही. घटनेनंतर आधी आरोपी बसमधून उतरला आणि वेगाने पसार झाला. थोड्या वेळाने पीडित तरुणी खाली आली आणि दुसऱ्या बसमधून पुढच्या प्रवासाला रवाना झाली. प्रवासादरम्यान पीडितेने एका मित्राला फोन करुन घटनेची माहिती दिली. या मित्राने दिलेला सल्ला पटला म्हणून तरुणी हडपसर जवळ बसमधून उतरली आणि दुसऱ्या वाहनाने पुन्हा स्वारगेट येथे आली. स्वारगेट पोलिसांकडे तरुणीने बलात्कार प्रकरणी तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेले.
Comments
Add Comment

पुणे महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल आंदेकर; प्रभाग २३ मध्ये धंगेकरांना धक्का

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मधून एक वेगळाच राजकीय निकाल समोर आला आहे. नाना पेठ आणि

Pune Andekar Family : सूनेनंतर सासूनेही मारलं मैदान ! पुण्यात लक्ष्मी आंदेकरचा थरारक विजय

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मध्ये चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत सूनेनंतर आता

Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालन्यातून विजयी, राजकीय पक्षांच्या दिग्गजांना चारली धूळ

जालना : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालांत जालन्यातून एक धक्कादायक आणि चर्चेचा निकाल समोर आला आहे. ज्येष्ठ

Pune Mahapalika Result : पुणे महापालिका निकाल : एकत्र येऊनही काका पुतण्याचं नुकसान, भाजप आघाडीवर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निकालात भारतीय जनता पक्षाने स्पष्ट आघाडी घेत शहराच्या राजकारणात आपली ताकद दाखवून

जळगावकर म्हणतायत.. तुमची आमची भाजपा सर्वांची! भाजपचा हा नेता ठरला धुरंधर

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणात शतप्रतिशत विजय मिळवला आहे.

Solapur election result : सोलापुरात काँग्रेसचा सुफडा साफ; खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रभागात भाजपचा दणदणीत विजय

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणूक निकालात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती