Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

पुण्याच्या विमानतळाशेजारी उभी राहिली अनधिकृत मझार

पुण्याच्या विमानतळाशेजारी उभी राहिली अनधिकृत मझार
पुणे : पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी शेजारी एक अनधिकृत मझार उभारण्यात आली आहे. या मझारमध्ये येण्याच्या निमित्ताने विमानतळावरील हालचालींची लांबून पाहणी करणे सोपे आहे; अशा स्वरुपाची तक्रार देशाचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करण्यात आली आहे. मझार उभारण्यासाठी अज्ञातांनी विमानतळाची बाउंड्री वॉल अर्थात संरक्षक भिंत पाडून नंतर थोड्या बदलांसह पुन्हा बांधली आहे. विमानतळाच्या जवळून जाणाऱ्या रस्त्याने नियमित प्रवास करणाऱ्यांना हा बदल लगेच लक्षात आला. ज्यांना बदल लक्षात आला त्यातल्याच एका व्यक्तीने देशाचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तक्रार केली आहे.



जर अनधिकृत मझारसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संरक्षक भिंतीत बदल केला जात असेल तर भविष्यात काहीही घडू शकते; अशा स्वरुपाची भीती तक्रारदाराने व्यक्त केली आहे. मझार, दर्गा, मशीद अशा स्वरुपाची अनधिकृत बांधकामं करायची आणि रेल्वे, विमानतळ, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा येथील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवायचे असा प्रकार वाढत चालला आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईत अरबी समुद्रात एका मोठ्या दगडावर अनिधकृत बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाद्वारे समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही बाब एका भाषणात निदर्शनास आणून दिली. यानंतर जाग आलेल्या सरकारने तातडीने कारवाई करुन अनधिकृत बांधकाम पाडले. यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्या भागात बांधत आहेत; त्या भागाजवळ पण एक अनधिकृत बांधकाम आढळले होते. आता पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी शेजारी अनधिकृत मझार उभारण्यात आली आहे.



अनधिकृत बांधकाम करायचे आणि तिथून रेल्वे, विमानतळ, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा येथील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवायचे. बांधकाम पाडण्यासाठी प्रशासन सरसावले की धार्मिक भावना दुखावल्याचे सांगून गळे काढायचे असे प्रकार होतात. यामुळे वेळीच पुण्यातील विमानतळाशेजारी उभी राहिलेली अनधिकृत मझार लवकर हटवावी; अशी मागणी देशाचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.
Comments
Add Comment