'छावा'तील सोयराबाईंच्या डिलीटेड सीनची चर्चा

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे १३० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या छावा चित्रपटाने ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. सुपरहिट झालेल्या या चित्रपटातील एका डिलीटेड सीनची माहिती प्रसारमाध्यमांच्या हाती आली आहे. सोशल मीडियातही या सीनची चर्चा सुरू झाली आहे.





'छावा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यावेळी त्यात छत्रपती संभाजी महाराज आणि पत्नीसह लेझीम नृत्य करत असल्याचे एक दृश्य होते. या दृश्यावरुन आक्षेप घेण्यात आले. अखेर नागरिकांच्या भावनांचा मान राखत चित्रपटातून वादाचे कारण ठरलेले लेझीम नृ्त्य काढण्यात आले. यानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या उत्साहवर्धक वातावरणात अचानक 'छावा' चित्रपटातील राजमाता सोयराबाईंच्या एका डिलीटेड सीनची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.



राजमाता सोयराबाई आणि हंबीरराव मोहिते यांच्यात एक संवाद होताना दिसत आहे. अभिनेता आशुतोष राणा हा हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री दिव्या दत्ता राजमाता सोयराबाई यांच्या भूमिकेत आहे. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या मुलाला म्हणजेच अकबरला भेटल्यानंतरचे हे दृश्य आहे. यात हंबीरराव हे सोयराबाईंना स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानांची आठवण करुन देतात. यानंतर ते सोयराबाईंच्या उद्दिष्टांबाबत प्रश्न उपस्थित करतात. हा संवाद मनाचा ठाव घेतो. याच कारणामुळे हा सीन व्हायरल होत आहे. सोशल मीडियात या सीनची चर्चा सुरू आहे. दमदार अभिनय, अप्रतिम संवाद... असे असूनही हा संवाद चित्रपटातून का वगळला ? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत.
Comments
Add Comment

रिया चक्रवर्तीला दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : मॅनेजरनेच दिले विष, समोर आली धक्कादायक माहिती

सिंगापूर : सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग याचा १९ सप्टेंबरला सिंगापूर येथे नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिवल दरम्यान बुडून

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास!

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता व्ही. शांताराम यांच्या पत्नी, ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्री संध्या

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक

गरोदरपणानंतर रुबिना दिलीकचा आत्मविश्वास डगमगला!

मुंबई: पती-पत्नी और पंगा या शोमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैक पती अभिनव शुक्ला सोबत मस्ती करताना दिसत आहे. या

तर त्या पुरस्काराला काही अर्थ नाही: राणी मुखर्जी

एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीने तिच्या राष्ट्रीय पुरस्कारानंतरच्या भावना व्यक्त केल्या. ती