घटस्फोट घेणार असल्याच्या वृत्तावर काय म्हणाला बॉलिवूड अभिनेता गोविंदा ?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा अरुण आहुजा घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त आहे. गोविंदा आणि सुनिताच्या लग्नाला ३७ वर्षे झाल्यानंतर गोविंदाने घटस्फोट घेण्याबाबत विचार सुरू केल्याचे वृत्त आहे. मागील काही दिवसांपासून गोविंदा आणि सुनिता वेगवेगळे राहू लागले आहेत. यामुळे गोविंदा घटस्फोट घेणार असल्याच्या वृत्ताला महत्त्व आले आहे. या संदर्भात थेट गोविंदाकडे चौकशी केली असताना त्याने मोघम उत्तर दिले. सध्या एका चित्रपटाच्या तयारीत गुंतलो आहे. इतर विषयांचा विचार करायला वेळ नाही किंवा त्यावर बोलायला वेळ नाही; असे गोविंदा म्हणाला. तर बातम्या काहीही येत असल्या तरी आपण काही दिवस थांबायला हवं, अधिकृत माहिती येण्याची वाट बघायला हवी; असे गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा म्हणाला. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सुनिता मॅडम थोडं जास्तच बोलून गेल्या. यामुळे तणाव निर्माण झाला आहे. पण बाकी अजून काही घडलेले नाही. आपण थोडं थांबायला हवं; असेही गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा म्हणाला.



गोविंदाच्या घटस्फोटाच्या वृत्ताबाबत पुतण्या कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मिरा शाह या दोघांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोघांनी सावध पवित्रा घेतला. 'खासगी आयुष्याविषयी आम्ही काहीच बोलू शकत नाही. त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली आहेत. काही वादाचे मुद्दे असलेच तर चर्चेतून आणि सामंजस्यातून सुटू शकतात. टोकाचा निर्णय घ्यावा अशी परिस्थिती असल्यासारखे वाटत नाही'; असे कृष्णा आणि कश्मिरा यांनी सांगितले. गोविंदाचा भाचा विनय आनंद आणि भाची आरती या दोघांनीही गोविंदाच्या घटस्फोटाच्या वृत्ताबाबत प्रतिक्रिया देताना सावध पवित्रा घेतला. लग्नाला ३० - ४० वर्षे झाल्यावर कोणी टोकाचा निर्णय घेण्याचा विचार करेल असे वाटत नाही; असे त्यांनी सांगितले.



सध्या गोविंदा एका घरात आणि सुनिता दुसऱ्या घरात वास्तव्यास असल्याचे वृत्त आहे. सुनितासोबत मुलगी नम्रता उर्फ टीना आणि यशवर्धन आहे. गोविंदाचा मुलगा यशवर्धन लवकरच एका चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.



नेमके काय घडले ?

एका मुलाखतीत गोविंदाची काय फालतू लोकांसोबत उठबस सुरू असल्याचे सुनिता यांनी सांगितले. त्यांनी गोविंदाच्या सध्याच्या वर्तुळाबाबत नाराजी व्यक्त केली. यानंतर गोविंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटाचे वृत्त येण्यास सुरुवात झाली आहे. पण अद्याप गोविंदा किंवा सुनिताकडून घटस्फोटाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. दोघांपैकी कोणीही एकमेकांच्या विरोधात घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली नाही, असे गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हाने सांगितले.
Comments
Add Comment

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत