Mahashivratri : महाशिवरात्रीदिवशीच महादेव मंदिरातून प्राचीन शिवलिंग चोरीला!

सुरत : महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2025) उत्सव आज संपूर्ण देशभरात मोठ्या उस्‍ताहाने साजरा होत आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अशावेळीच गुजरातच्या एका मंदिरातून प्राचीन शिवलिंगाची चोरी झाल्‍याचे समोर आले आहे. या बातमीने परिसरात खळबळ उडाली आहे. (Theft case)



पोलिसांच्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे काल पुजाऱ्याने पुजेसाठी मंदिराचा दरवाजा उघडला, तेंव्हा आतले दृष्‍य पाहून त्‍याला धक्‍का बसला. पुजाऱ्याने जसा मंदिराचा दरवाजा उघडला तेंव्हा त्‍याला शिवलिंग जाग्‍यावर नसल्‍याचे दिसून आले. यानंतर पुजाऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली. भीडभंजन भवनेश्वर महादेव मंदिर देवभूमी व्दारका जिल्‍ह्यात समुद्राच्या किनाऱ्यावर कल्‍याणपूर येथे वसले आहे. हे मंदिर खूप प्राचीन असल्‍याचे सांगण्यात येते. मात्र, महाशिवरात्रीच्या आदल्‍या दिवशी घडलेल्‍या या चोरीच्या प्रकाराने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी शिवलिंग शोधण्यासाठी पथके करून तपासाला सुरूवात केली आहे. यामध्ये स्‍थानिक गुन्हे अन्वेशन, क्राईम ब्रांच, स्‍पेशन ऑपरेशन ग्रुप आणि फॉरेन्सिक एक्‍सपर्टची टीम सहभागी झालेली आहे. डॉग स्‍क्‍वॉडची देखील मदत घेतली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी भीडभंजन भवनेश्वर महादेव मंदिराच्या पुजारीने या घटनेची माहिती दिली की, मंदिरात शिवलिंगाची चोरी झालेली आहे.त्‍यावरून आम्‍ही या ठिकाणी येउन पाहणी केली आहे. या शिवलिंगाच्या शोधासाठी आम्‍ही पथके तयार केली आहेत. हे शिवलिंग समुद्रातही लपवले असण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे आम्‍ही विशेष स्‍कुबा डायव्हर्स आणि पोहणाऱ्यांनाही बोलावले आहे. हे मंदिर प्राचीन असून, भाविकांची या मंदिराप्रती मोठी श्रद्धा जोडली गेली आहे.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional