Pink E-Rickshaw : अमरावती ई पिंक- रिक्षासाठी केवळ २९३ महिला ठरल्यात पात्र

अमरावती : महिला सक्षमीकरण व आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, या संकल्पनेतून महिलांसाठी असलेल्या ई-पिंक रिक्षा योजनेस प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अमरावती जिल्ह्यासाठी ६०० रिक्षांचे उद्दिष्ट असताना केवळ २९३ लाभार्थी महिलांचे अर्ज आले आहेत. उद्दिष्टपूर्ती कशी करावी, असा प्रश्न त्यामुळे महिला व बालविकास विभागासमोर उभा झाला आहे.


खास महिलांसाठी २०२४ मध्ये ई-पिंक रिक्षाची योजना राज्य सरकारने महिला व बालविकास विभागामार्फत लागू केली आहे. २.७८ लाख रुपये किमतीचा एक ई-पिंक रिक्षा लाभार्थ्याला एकूण रकमेच्या ७० टक्के कर्जावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाभाथ्यनि स्वतःचा हिस्सा १० टक्के द्यायचा असून, २० टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे. लाभार्थ्यांना ८० हजार रुपयांची सबसिडी मिळणार आहे.जिल्ह्यासाठी ६०० रिक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यामध्ये अमरावती शहरासाठी ३०० व ग्रामीण शहरी भागासाठी ३००, अशी उद्दिष्टांची विभागणी करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी लागू झालेल्या या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातून २९३ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यास मंजुरी देण्यात आल्याचे महिला व बालविकास अधिकारी टेकाळे यांनी सांगितले.



लाभार्थी महिलांना ७० टक्के कर्ज विविध बँकांकडून मिळवून देण्यासाठी उत्पादक कंपनी स्वतः प्रयत्न करणार आहे. या कंपनीची चमू येणार असून ती बँकांसोबत करार करून कर्ज उपलब्ध करून देतील. यासाठी महिला लाभार्थ्यांचे सिबिल तपासण्यात येणार आहे. या रिक्षा शहरातील कोणत्या मार्गावर चालवण्यात याव्यात, ते प्रादेशिक - परिवहन विभागाकडून निश्चित - करण्यात येणार आहे. ई-रिक्षांसाठी - चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असले तरी त्यासाठी अद्याप जागेची निवड करण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस

Gahininath fort : गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न बीड : म्हसोबावाडी (ता.

All priests will earn the same : मंदिरांतील पुजाऱ्यांचे मानधन एकसमान होणार

राज्य सरकार धोरण ठरवणार; मंत्रालयात झाली विशेष बैठक मुंबई : काही देवस्थानांमध्ये पुजाऱ्यांना नियमित वेतन दिले

Jalna Murder Case : आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ठरवलेला दिवसच ठरला अंतिम, पोटच्या मुलानेच केली निघृण हत्या

जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या

Pune News : मांजरी स्टेशनचा कायापालट तर रामटेकडीला मिळणार नवे ब्लॉक स्टेशन

पुणे : पुणे रेल्वे विभागाने वाढती प्रवासी गर्दी आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन दोन महत्त्वाचे प्रकल्प

CM Fellowship : तरुणांसाठी मंत्रालयात कामाचा थाट, पगारही जोरात! मुख्यमंत्री फेलोशिपसाठी महिना ६१,५०० रुपयांची संधी; कसा कराल अर्ज ?

मुंबई : राज्यातील कल्पक आणि उत्साही तरुणांसाठी प्रशासकीय सेवेचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी पुन्हा एकदा उपलब्ध