नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ तासांत तीन राज्यांचा मॅरेथॉन दौरा केला. त्यांनी २४ फेब्रुवारीला सकाळचा नाश्ता मध्य प्रदेशात केला. त्यानंतर दुपारचे जेवण बिहारमध्ये केले आणि रात्रीचे जेवण ते आसामध्ये जेवले. खरंतर, पंतप्रधान मोदी २३ फेब्रुवारीलाच मध्य प्रदेशात पोहोचले होते. त्यांनी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृ्ष्णा शास्त्री यांच्या निमंत्रणावरून छतरपूर येथे गढा गावांत बागेश्वर धाम चिकित्सा तसेच विज्ञान संशोधन संस्थेचा शिलान्यास केला.
या रुग्णालयाची निर्मिती बागेश्वर धाम ट्रस्ट करून केली जात आहे. या रुग्णालय निर्मितीचे उद्दिष्ट वंचित गटातून आलेल्या कॅन्सर रुग्णांना मोफत उपचार प्रदान करणे. रुग्णालय हे अत्याधुनिक केमोथेरपी आणि कॅन्सर उपचारांच्या सुविधांनी सुस्सज असेल. याच्या पुढच्याच दिवशी २४ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींनी भोपाळमध्ये ग्लोबल इनव्हेस्टर्स समिटचे उद्घाटन केले.
यानंतर पंतप्रधान मोदी बिहारमध्ये पोहोचले. त्यांनी भागलपूरमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत जनसभा घेतली. यावेळेस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९वा हप्ता जारी केला. यावेळेस पंतप्रधान मोदींनी विविध विकासयोजनेंचेही उद्घाटन केले.
बिहारनंतर पंतप्रधान मोदी सोमवारी संध्याकाळी आसामच्या दौऱ्यावर पोहोचले. येथे ते सरुसजाई स्टेडियममध्ये आयोजित झुमोईर बिनंदिनी २०२५ या कार्यक्रमात सामील झाले.