महाशिवरात्रीला २४ तास खुले राहणार त्र्यंबकेश्वर मंदिर

  174

त्र्यंबकेश्वर: महाशिवरात्रीला त्रंबकेश्वरी लक्षावधी भाविक दर्शनाला येत असतात. त्यामुळे भाविकांसाठी ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर मंदिर अहोरात्र २४ तास खुले राहणार आहे. बुधवार गुरुवार धरून ४८ तास मंदिर खुले राहील. महाशिवरात्री दिनी होणारी शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता देणगी दर्शन रुपये २०० माणसी ऑनलाइन सुविधा दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच २६ व २७ हे दोन दिवस व्हीआयपी दर्शन बंद आहे तसे गर्भगृहदर्शनाला परवानगी देण्यात आललो नाही.


महाशिवरात्रीच्या दिवशी २६ रोजी मंदिर पहाटे ४ वाजता मंदिर उघडेल. त्र्यंबकेश्वराची पालखी दुपारी 3 वाजता त्र्यंबकेश्वर मंदिरातून निघेल. पालखी त्र्यंबकेश्वराची सोन्याची मूर्ती असते . या मूर्तीला कुशावर्त तीर्थावर जलाभिषेक घालण्यात येईल. पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरात परतेल. यंदाच्या सर्वाध्ये मिरवणुकीत शिवतांडव नृत्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीला त्रंबकेश्वर मंदिरात मध्यरात्री भगवान त्रंबकेश्वराची महापूजा करण्यात येईल यावेळी देखील मंदिरांतर्गत पालखी निघेल. सवाद्य पालखी मोठा उत्सव असतो.


महिला भाविक त्र्यंबकेश्वर मंदिरात सायंकाळी महाशिवरात्र वाती मंदिरा आवारात प्रज्वलित करतात . मंदिरात रांगेत असणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान देते. देवस्थानचे अध्यक्ष न्यायाधीश नितीन जीवने यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे सर्व विश्वस्त व अधिकारी वर्ग उत्सवाचे नियोजन करीत आहे. एस टी महामंडळाकडून ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहे. त्रंबकेश्वर नगरपालिकेकडून स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. तर वाढू ज्यादा पोलीस बंदोबस्त त्र्यंबकेश्वर पोलीस यंत्रणे कडून ठेवण्यात येणार आहे. महाशिवरात्रीला अभिषेक करणे उसाचा रस आंब्याचा मोहर बेल शंकराच्या पिंडीवर वाहणे भगवान शिवाची पोथी वाचणे दिवसभर उपास करणे असे व्रत भाविक करतात. पार्वती मातेने महाशिवरात्रीचे व्रत केले.


महाशिवरात्रीला शिवपार्वतीचा विवाह झाला अशी आख्यायिका आहे.त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची धारणा आहे. श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून त्रंबकेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे तसेच मंदिरांतर्गत फुलांचे सजावट करण्याचे काम वेगाने सुरू आहे.. दरम्यान त्रंबकेश्वर देवस्थाने कायमस्वरूपी भाविकांसाठी अल्प दरात अथवा मोफत महाप्रसादाचे सुविधा करावी अशी जुनी मागणी भाविकांनी पुन्हा केली आहे. महाप्रसाद सुविधा देण्याची मागणी वाढत आहे. दरम्यान त्रंबकेश्वर मंदिरात तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्यायाधीश जीवन यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्ट मंडळ नियोजन करून आहे.

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने