Sunday, April 20, 2025
Homeदेशशशी थरुर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर नाराज

शशी थरुर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर नाराज

नवी दिल्ली : केरळ काँग्रेसचे नेते खासदार शशी थरुर हे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. ते गांधी परिवारावरही नाराज असल्याचे वृत्त आहे. एका पॉडकास्टमध्ये थरुर यांनी त्यांच्या नाराजीला मोकळी वाट करुन दिली. याआधी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे थरुर यांनी जाहीररित्या कौतुक केले.

Ind vs Pak: कोहलीचे ‘विराट’ शतक, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आणि प्रवक्ते मोदींवर टीका करत असताना थरुर यांनी वेगळी भूमिका घेतली. पॉडकास्टमध्ये तर शशी थरुर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वालाच खडे बोल सुनावले. ‘केरळमध्ये काँग्रेसच्या मतांचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. हे प्रमाण वाढवता येईल. पण याकरिता काँग्रेसला स्वतःच्या कामाची पद्धत बदलावी लागेल. जनतेशी थेट संवाद साधावा लागेल. जनतेच्या आशाआकांक्षा, स्वप्न समजून घेऊन त्यासाठी काम करावं लागेल. जनतेमध्ये पक्षाविषयी विश्वास निर्माण करावा लागेल. केरळमध्ये डाव्या पक्षांनी नागरिकांमध्ये स्वतःची उत्तम प्रतिमा निर्माण केली. लोकांना विश्वास वाटला म्हणून ते आजही निवडणुका जिंकत आहेत. तर भाजपाने देश पातळीवर स्वतःविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. काँग्रेस असे करताना दिसत नाही. काँग्रेसचे मताधिक्य अर्थात व्होट शेअर वाढताना दिसत नाही. कालबाह्य होत असलेल्या विचार आणि संकल्पना पक्षाला मताधिक्य वाढवून देणार नाही’; असे शशी थरुर म्हणाले.

पालघरमधील औषध निर्मात्या कंपनीवर कारवाई, दोन पेनकिलर औषधांवर बंदी

केरळमध्ये काँग्रेसची ताकद मर्यादीत आहे. अनेकांना काँग्रेस पक्ष आवडत नाही. पण या प्रतिकूल परिस्थितीतही मी निवडणूक जिंकतोय कारण लोकांना माझं म्हणणं पटतंय. त्यांना माझ्याविषयी विश्वास आहे. हा विश्वास ढळू देणार नाही, असे शशी थरुर म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -