पालघर : केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील एव्हिओ (Aveo) नावाच्या औषध कंपनीवर कारवाई केली आहे. या कंपनीच्या टॅपेंटाडॉल आणि कॅरिसोप्रोडॉल या दोन औषधांचे उत्पादन आणि निर्यात करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. ही दोन वेदनाशामक औषधे अर्थात पेनकिलर असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या औषधांमुळे आफ्रिका खंडातील नायजेरिया, घाना, कोट डी’आयव्होअर आदी देशांमध्ये आरोग्य संकट निर्माण झाल्याचे वृत्त ‘बीबीसी’ने दिले होते. या वृत्ताची दखल घेऊन केंद्र सरकारने कारवाई केली आहे. भारताचे औषध आणि नियंत्रक जनरल डॉ. राजीव सिंग रघुवंशी यांनी ही कारवाई केल्याची माहिती दिली. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९५० अंतर्गत कंपनीला आधीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
Ind vs Pak: कोहलीचे ‘विराट’ शतक, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
टॅपेंटाडॉल तीव्र वेदनांचे शमन करण्यासाठी उपयुक्त आहे. तर कॅरिसोप्रोडॉल स्नायूंना शिथील करण्यास आणि वेदनांचे शमन करण्यास उपयुक्त आहे. प्रामुख्याने हाडांशी संबंधित दुखापती झाल्यास वेदनांचे शमन करण्यासाठी कॅरिसोप्रोडॉल उपयुक्त आहे. एव्हिओ फार्मास्युटिकल्स कोणत्याही मंजुरीशिवाय दोन्ही औषधांचे मिश्रण म्हणून टॅफ्रोडॉल ब्रँड तयार करत होते. हे औषध आफ्रिका खंडात निर्यात केले जात होते.
विराट कोहलीने केला सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम, हार्दिकने ओलांडला २०० बळींचा टप्पा
बीबीसीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी औषध आफ्रिका खंडातील नायजेरिया, घाना, कोट डी’आयव्होअर आदी देशांमध्ये विकण्यासाठी पाठवले जात असल्याचे सांगितले. कंपनीच्या औषधामुळे आफ्रिकेत आरोग्य संकट निर्माण झाले. यानंतर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे कारवाई केली. देशाची आणि राज्याची बदनामी करणारे विघातक कार्य केल्याप्रकरणी एव्हिओ कंपनी आणि तिच्याशी संबंधित अनेकांवर कारवाई सुरू झाली आहे.