Friday, March 28, 2025
Homeक्रीडाInd vs Pak: कोहलीचे 'विराट' शतक, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Ind vs Pak: कोहलीचे ‘विराट’ शतक, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

दुबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती विराट कोहली. विराट कोहलीच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला.

पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी २४२ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान ४५ बॉल राखत पूर्ण केले. या सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त खेळी केली. विराट कोहलीने १११ बॉलमध्ये १०० धावा केल्या.

पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी महागडा ठरला. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत केवळ २४१ धावा केल्या. पाकिस्तानकडून सौद शकीलने ६२ धावांची सर्वाधिक खेळी केली. तर कर्णधार मोहम्मद रिझवानने ४६ धावा ठोकल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडले. त्यानंतर हार्दिक पांड्याने २ गडी बाद केले.

त्यानंतर भारतीय संघ २४२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला. सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा झटपट बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीची जोडी जमली. या जोडीने १०० धावसंख्या पार केली. शुभमन गिलने ४६ धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक केवळ ४ धावांनी हुकले.

कोहलीने या सामन्यात जबरदस्त शतक ठोकले. कोहली ९६ वर खेळत असताना भारताला विजयासाठी २ धावा हव्या होत्या. कोहलीने जबरदस्त चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. यासोबतच भारताने विजय साकारला.

विराट कोहलीचे हे वनडेतील ५१वे शतक होते. कोहलीने खुशदिल शाहच्या बॉलवर जबरदस्त चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. सोबतच भारताने विजय मिळवला. कोहलीने १११ बॉलमध्ये नाबाद १०० धावा ठोकल्या. कोहलीच्या आधी श्रेयस अय्यरने

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -