विराट कोहलीने केला सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम, हार्दिकने ओलांडला २०० बळींचा टप्पा

दुबई : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय क्रिकेटपटू होण्याचा मान विराट कोहलीने पटकावला आहे. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५७ झेल घेतले. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात नसीम शाहला झेलबाद केले. नसीम शाह १४ धावा केल्यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर कोहलीकडे झेल देऊन परतला. हाच विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये घेतलेला १५७ वा झेल ठरला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय क्रिकेटपटू

विराट कोहली (खेळत आहे) १५७ झेल
मोहम्मद अझरुद्दीन (निवृत्त) १५६ झेल
सचिन तेंडुलकर (निवृत्त) १४० झेल
राहुल द्रविड (निवृत्त) १२४ झेल
सुरेश रैना (निवृत्त) १०२ झेल

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम करणारा क्रिकेटपटू

महेला जयवर्धने, श्रीलंका (निवृत्त) २१८ झेल
रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलिया (निवृत्त) १६० झेल
विराट कोहली, भारत (खेळत आहे) १५७ झेल

हार्दिक पांड्याने घेतले २०२ आंतरराष्ट्रीय बळी

भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२ बळी घेतले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ११ सामन्यांतील १९ डावांत गोलंदाजी करुन १७ बळी घेतले. तसेच त्याने ११४ टी २० सामन्यांतील १०२ डावांत गोलंदाजी करुन ९४ बळी घेतले. हार्दिकने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९१ सामन्यांतील ८५ डावांत गोलंदाजी करुन ८९ बळी घेतले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने ८ षटकांत ३१ धावा देत दोन बळी घेतले. त्याने बाबर आझमला २३ धावा केल्यानंतर यष्टीरक्षक केएल राहुलकरवी झेलबाद केले तर सौद शकीलला ६२ धावा केल्यानंतर अक्षर पटेलकरवी झेलबाद केले.
Comments
Add Comment

आश्चर्यकारक! एकदिवसीय सामन्याची तिकीटं आठ मिनिटांत फूल, विराट अन् रोहितची क्रेझ

मुंबई: भारतातील क्रिकेट विश्व सध्या चर्चेत आहे. केवळ पुरुष नाही तर भारतीय महिला संघाचेसुद्धा सर्वत्र कौतुक सुरू

नववर्षाच्या सुरुवातीला भारतीय महिला संघाने घेतले बाबा महाकाल दर्शन

२०२५ च्या अखेरीस धमाका करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूंनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाबा

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०