Kasara Ghat : मुंबई-नाशिक मार्गावरील जुना कसारा घाट आठ दिवस बंद

शहापूर  : मुंबई - नाशिक महामार्गावरील नाशिककडे जाणाऱ्या जुन्या कसारा घाटातील रस्त्याची दुरुस्ती दोन टप्प्यांत होणार असल्याने आठ दिवस हलक्या व अवजड वाहनांसाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नवीन कसारा घाटातून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.



मुंबई - नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात किमी ४६६/८०० ते ४७४/३०० दरम्यान रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याकरिता २४ ते २७ फेब्रुवारी व ३ ते ६ मार्च दरम्यान सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हलक्या व जड वाहनांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये व चालकांना इप्सित स्थळी जाण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून चालकांनी पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे आवाहन पोलीस महासंचालक डॉ. सुरेशकुमार मेकला यांनी केले आहे. नाशिक दिशेला जाणारी वाहने ४७४/३०० चिंतामणवाडी पोलीस चौकी समोरून वाहतूक उजव्या बाजूने नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत जुना कसारा घाट वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे.


तसेच नाशिक ते मुंबई वाहतूक करणारी वाहने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० वरून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच मुंबई-नाशिक वाहतूक करणारे वाहनांनी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग क्र. ६० वरून इच्छित स्थळी जातील.

Comments
Add Comment

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास