मुंबई: भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची सुरूवात चांगली झाली आहे. टीम इंडियालाने पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवले. आता भारताचा आज सामना पाकिस्तानशी होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पाचवा सामना दुबईत आयोजित होईल. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर त्यांचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित होईल. मात्र पाकिस्तान या पराभवासह सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर जाईल.
भारत आणि पाकिस्तानचे संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या ग्रुप एमध्ये सामील आहेत. जर ग्रुप एचे पॉईंट्स टेबल पाहिले तर सध्या भारत दुसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी एकच सामना जिंकला आहे. मात्र न्यूझीलंडचा रनरेट भारतापेक्षा चांगला आहे. आता भारताने पाकिस्तानला हरवल्यास सेमीफायनलमधील त्यांचे स्थान निश्चित आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ८ संघांपैकी चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील. ग्रुप एच्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहे. तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा रनरेट +1.200 तर भारताचा रनरेट +0.408 आहे. बांग्लादेश तिसऱ्या आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.
ग्रुप बी चा पॉईंट्स टेबल पाहिल्यास दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यांचा रनरेट +2.140 आहे. तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. इंग्लंड तिसऱ्या आणि अफगाणिस्तान चौथ्या स्थानावर आहे.
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदलाची शक्यता नाही
टीम इंडियाच्या प्लेईंग ११मध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. पाकिस्तानविरुद्ध शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल हे प्रमुख भूमिका निभावू शकतात. टीम इंडियाच्या गोलंदाजीत मोहम्मद शमी जरूर असेल. शमी भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो.