Pune Crime : छावा चित्रपटाचा पोलिसांना फायदा, दोन मकोका आरोपींना अटक

पुणे : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा हिंदी चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने शनिवार २२ फेब्रुवारी पर्यंत सुारे २५० कोटी रुपयांची कमाई केली. महाराष्ट्रात हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला आहे. निर्मात्याला फायदा मिळवून देत असलेल्या या चित्रपटामुळे पोलिसांचाही फायदा झाला आहे. पोलिसांना 'छावा' चित्रपटाच्या निमित्ताने दोन मकोका आरोपींना अटक करणे शक्य झाले आहे.



'छावा'चित्रपट बघण्यासाठी वैभव टॉकीज येथे धर्मेनसिंग ऊर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (२२) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (२३) हे दीघीतील शिव कॉलनीत राहणारे मकोकाचे आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस मागील काही दिवसांपासून या आरोपींना शोधत होते. अखेर या आरोपींना 'छावा' चित्रपटाच्या निमित्ताने अटक करणे पोलिसांना शक्य झाले.



दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), ‘एनडीपीएस’ कायदा आणि शस्त्र कायद्यानुसार दीघी पोली ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने आरोपी चित्रपट बघण्यासाठी आल्याची माहिती मिळताच कोंम्बिग ऑपरेशन केले. पोलिसानी आरोपींना अटक केली. यानंतर आरोपींचा ताबा गुन्हे शाखेने दीघी पोलिसांना दिला. आरोपींची दीघी पोलीस कसून चौकशी करत आहेत. आरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचाही तपास सुरू आहे.

 
Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा