Bobby Deol : अक्षय खन्नानंतर 'हा' अभिनेता साकारणार औरंगजेबाची भूमिका; नव्या चित्रपटाची देशभरात चर्चा!

  199

मुंबई : देशभरात सध्या छावा (Chhaava) चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका केली आहे. तर बादशाहा औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना (Akshaye Khanna) या अभिनेत्याने केली आहे. विकी कौशलसह अक्षय खन्नाने साकारलेल्या भूमिकेबाबत सर्वत्र वाहवा होत आहे. अशातच आता आणखी एक अभिनेता आगामी नव्या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे.



दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत लवकरच 'हरी हर वीरमल्लू' (Hari Hara Veera Mallu) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे टिझरही समोर आले आहे. या चित्रपट सुप्रसिद्ध पवण कल्याण हा वीरमल्लू यांच्या भू्मिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडमध्ये गॉड या नावाने प्रसिद्ध असलेला बॉबी देओल (Bobby Deol) हा या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेचा चित्रपटातील लूकदेखील समोर आला आहे. त्यामध्ये बॉबी देओल एका राजाच्या गणवेशात दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटात  मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे.



चित्रपटात नेमके काय असेल?


छावा चित्रपटासाठी अक्षय खन्ना या अभिनेत्याला २ कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे. तर दुसरीकडे बॉबी देओलला मात्र बादशाहा औरंगजेब साकारण्यासाठी तीन कोटी रुपये फी म्हणून देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. लवकरच हा चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमके काय असेल? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा