'मला हलक्यात घेऊ नका'

नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नागपूरमध्ये पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. मागील काही दिवसांत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांना अनुपस्थित राहिलेले एकनाथ शिंदे महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमानांही गैरहजर राहिले आहेत. त्यांचा सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावातला मुक्काम वाढला होता. यामुळे महायुतीत तणाव आहे का ? शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज आहेत का ? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना, 'मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा' असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे नक्की कोणाला उद्देशून बोलत होते यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे.



निवडणूक जिंकल्यावर येईन असे म्हणालो होतो म्हणून आता विदर्भाच्या दौऱ्यावर आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांचे नियोजीत कार्यक्रमानुसार विदर्भात दोन मोठे मेळावे होणार आहेत. याआधी पत्रकारांशी बोलताना शिंदेंनी सांगितले की, 'ज्यांनी मला हलक्यात घेतले, त्यांचा मी २०२२ मध्ये टांगा पलटी केला. सरकार बदललं आणि लोकांच्या मनातला डबल इंजिनचा सरकार आणून दिले. विधानसभा निवडणुकीच्या आधी सांगितले होते की, मी आणि देवेंद्र फडणवीस २०० पेक्षा जास्त जागा निवडून आणू, यंदाच्या निवडणुकीत २३२ जागा आणल्या आहेत. त्यामुळे, लोकांनी मला हलक्यात घेऊ नये, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा.'



शिवसेनेची विधानसभेतील ताकद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विधानसभेत ५७ आमदार निवडून आले. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या ८१ जागा लढवल्या होत्या. एकूण मिळालेल्या आणि पात्र ठरलेल्या मतांपैकी १२.३८ टक्के अर्थात ७९ लाख ९६ हजार ९२० मते शिवसेनेने मिळवली.
Comments
Add Comment

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही