Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

विराट कोहलीची अझरुद्दीनच्या विक्रमाला गवसणी, साधली बरोबरी

विराट कोहलीची अझरुद्दीनच्या विक्रमाला गवसणी, साधली बरोबरी
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या साखळी सामन्यात भारताच्या विराट कोहलीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमशी बरोबरी साधली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अझरुद्दीन आघाडीवर आहे. त्याने १५६ झेल घेतले आहेत. या विक्रमाशी विराट कोहलीने बांगलादेश विरुद्धचा सामना सुरू असताना बरोबरी साधली. मोहम्मद शमीच्या चेंडूवर जाकर अलीने फटकावलेला चेंडू विराट कोहलीने झेलला. हाच विराट कोहलीचा एकदिवसीय क्रिकेटमधील १५६ वा झेल आहे.



विशेष म्हणजे जाकर अलीला विराट कोहलीकरवी झेलबाद करुन मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमधील २०० वा बळी घेतला. जाकर अली ११४ चेंडूत ६८ धावा केल्यानंतर झेलबाद झाला. मोहम्मद शमीने १०४ सामन्यात ५१२६ चेंडू टाकून २०० बळी घेण्याची किमया साधली. त्याने बांगलादेश विरुद्धच्या दुबईतील सामन्यात सौम्या सरकार, मेहदी हसन मिराज आणि जाकर अली यांना बाद केले.
Comments
Add Comment