प्रियकराने प्रेयसीचे शिरच केले धडापासून वेगळे

  130

पोहोचला थेट पोलीस ठाण्यात; वांबोरीतील हृदयद्रावक घटना


राहुरी : अनैतिक संबंधातील वाद विकोपाला गेला तु मला नाही सांभाळले तर तुला सोडणार नाही. तुझ्या विरुध्द गुन्हा दाखल करेल, अशी धमकी देणाऱ्या २८ वर्षीय प्रेयसीला ५३ वर्षीय प्रियकराने लाकडी दांडा व दगडाने मारहाण केली. तसेच कोयत्याने वार करून तीचे शिर धडापासुन वेगळे करत थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात दि.१९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.


या घटनेतील मयत सोनाली राजु जाधव, वय २८ वर्षे, रा. पोखरी ता. आंबेगांव, जि. पुणे हिचे सखाराम धोंडीबा वालकोळी, वय ५३ वर्षे, रा. निरगुडसर, ता. आंबेगांव, जि. पुणे याच्याशी अनैतिक संबंध होते. दोघेजण काही काळ पती पत्नी सारखे राहत होते. काही दिवसापूर्वी मयत सोनाली ही तीचा प्रियकर सखाराम याला सोडून तीच्या पतीकडे गेली होती. त्यानंतर तीने पून्हा सखाराम याला फोन करुन सांगीतले कि, मला तूझ्याकडे यायचे आहे, मला पैसे दे, मी ज्याच्या सोबत गेले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. तसेच तु मला नाही सांभाळले तर मी तुला सोडणार नाही. तुझ्या विरुध्द गुन्हा दाखल करेल, अशी धमकी देऊ लागली. त्यामुळे सखाराम तीच्या धमकीला वैतागला होता.



दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास मयत सोनाली ही तीचा प्रियकर सखाराम याला भेटण्यासाठी पुणे येथुन नगर येथे आली. नगर बस स्थानकावर दोघांची भेट झाली. त्यानंतर सखाराम हा सोनाली हिला घेऊन राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव मंदीरा शेजारच्या डोंगराजवळ आला. सायंकाळी ७.३० वाजे दरम्यान त्या दोघांनी तेथे बसून गप्पा मारल्या. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. आणि सखाराम याने सोनाली हिला लाकडी दांडा व दगडाने मारहाण केली. त्यानंतर त्याने कोयत्याने सोनालीवर वार करून तीचे शिर धडापासुन वेगळे करून तीची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर आरोपी सखाराम हा स्वतः वांबोरी येथील पोलिस चौकीत हजर झाला आणि गुन्हा केल्याची कबूली दिली.


घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलिस अधिकारी डाॅ. बसवराज शिवपूजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, हवालदार वाल्मीक पारधी, सुनिल निकम, आजिनाथ पालवे, अंकुश भोसले आदि पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि मयत सोनाली राजू जाधव हिचे धड व धडापासुन वेगळे झालेले शिर ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. राहुरी पोलिस पथकाने आरोपीला गजाआड केले आहे. पोलिस नाईक सुनिल निकम यांच्या फिर्यादीवरून आरोपी सखाराम धोंडीबा वालकोळी, वय ५३ वर्षे, रा. निरगुडसर, ता. आंबेगांव, जि. पुणे याच्यावर गुन्हा रजि. नं. १३४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सुदर्शन बोडके हे
करीत आहे.

Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’