भाजपाच्या रेखा गुप्ता झाल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री

नवी दिल्ली : भाजपाच्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर परवेश साहेब सिंह वर्मा यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून परवेश साहेब सिंह वर्मा यांच्या व्यतिरिक्त आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रवींदर इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग यांनी शपथ घेतली.



रेखा गुप्ता या एनडीए शासित १८ राज्यांतील एकमेव महिला मख्यमंत्री आहेत. त्यांनी दिल्लीत २०२५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शालीमार बाग विधानसभा मतदारसंघांत आम आदमी पार्टीच्या वंदना कुमारी यांचा २९ हजार ५९५ मतांनी पराभव केला .

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत झाला शपथविधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. हा सोहळा दिल्लीच्या रामलीला मैदानावर झाला.

विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय

फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या विधानसभेसाठी निवडणूक झाली. विधानसभेच्या ७० पैकी ४८ जागा भारतीय जनता पार्टीने आणि २२ जागा आम आदमी पार्टीने जिंकला. काँग्रेस पक्ष सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकू शकलेला नाही. दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीचा पराभव करणाऱ्या भाजपाने दणदणीत विजय मिळवला. भाजपाने १९९३ नंतर पहिल्यांदाच दिल्लीत सत्ता स्थापन केली आहे. त्यांनी मागील १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीचा पराभव केला आहे. यामुळे भाजपासाठी दिल्लीतल्या विजयाला विशेष महत्त्व आहे.

कोण आहेत रेखा गुप्ता ?

जन्म : १९ जुलै १९७४, जुलाना, हरियाणा
दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम महाविद्यालयातून पदवी शिक्षण (बी कॉम)
मेरठच्या चौधरी चरणसिंग विद्यापीठाच्या आयएमआयआरसी कॉलेज ऑफ लॉ भाईना, गाझियाबाद येथून कायद्याचे शिक्षण
राष्ट्रीय स्वयंसेक संघाच्या सक्रीय कार्यकर्त्या
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सक्रीय कार्यकर्त्या
दिल्ली विद्यापीठात १९९६ - ९७ दरम्यान विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा
तीन वेळा दक्षिण दिल्ली महापालिकेच्या नगरसेविका आणि एकदा दक्षिण दिल्ली महापालिकेच्या महापौर
भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा
भाजपाच्या दिल्ली सरचिटणीस
गुरुवार २० फेब्रुवारी २०२५ पासून दिल्लीच्या मुख्यमंत्री
Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी