बांगलादेशचा डाव २२८ धावांत आटोपला

  69

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अ गटाच्या दुसऱ्या साखळी सामन्यात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशचा डाव ४९.४ षटकांत २२८ धावांत आटोपला. बांगलादेशची अवस्था पाच बाद ३५ अशी होती त्यावेळी त्यांचा डाव लवकर आटोपणार असे वाटत होते. पण शतकवीर तौहिद हृदयॉय आणि अर्धशतकवीर जाकर अली तसेच रिशाद हुसेन या तीन फलंदाजांच्या प्रयत्नांमुळे बांगलादेशने सर्वबाद २२८ धावा केल्या.





बांगलादेशकडून तन्झिद हसनने २५, सौम्या सरकारने शून्य, नजमुल हुसेन शांतोने (कर्णधार) शून्य, मेहदी हसन मिराजने पाच, तौहिद हृदयॉयने १००, मुशफिकुर रहीमने (यष्टीरक्षक) शून्य, जाकर अलीने ६८, रिशाद हुसेनने १८, तन्झीम हसन साकिबने शून्य, तस्किन अहमदने तीन, मुस्तफिजुर रहमानने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. बांगलादेशला ९ अवांतर मिळाले. भारताकडून मोहम्मद शमीने पाच, हर्षित राणाने तीन, अक्षर पटेलने दोन बळी घेतले. शमीने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात सौम्या सरकार, मेहदी हसन मिराज, जाकर अली, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद या पाच जणांना बाद केले.





मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०२ बळी घेतले. त्याने आयसीसीच्या विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून आतापर्यंत ६० बळी घेतले आहेत. तो आयसीसीच्या विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज झाला आहे. एकदिवसीय क्रिकेट या प्रकारात १०४ सामन्यात १०३ डावात ५१४० चेंडू टाकून ४७७५ धावा देत २०२ बळी घेतले. त्याची सरासरी २३.६४ एवढी आहे.



चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या साखळी सामन्यात भारताच्या विराट कोहलीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमशी बरोबरी साधली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अझरुद्दीन आघाडीवर आहे. त्याने १५६ झेल घेतले आहेत. या विक्रमाशी विराट कोहलीने बांगलादेश विरुद्धचा सामना सुरू असताना बरोबरी साधली. मोहम्मद शमीच्या चेंडूवर जाकर अलीने फटकावलेला चेंडू विराट कोहलीने झेलला. हाच विराट कोहलीचा एकदिवसीय क्रिकेटमधील १५६ वा झेल आहे.
Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र