म्हाडात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे हेलपाटे थांबणार

म्हाडाच्या नागरी सुविधा केंद्राचे काम अंतिम टप्प्यात, एप्रिलपासून होणार कार्यान्वित


मुंबई : म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारण्यात येणाऱ्या नागरी सुविधा केंद्राचे काम आता अंतिम टप्प्यात असून एप्रिलपासून हा कक्ष कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या कक्षामुळे विविध कामानिमित्त म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे हेलपाटे थांबणार आहेत.


म्हाडा मुख्यालयात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, गिरणी कामगार विभाग, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. विविध कामानिमित्त दिवसाला सुमारे चार ते पाच हजार नागरिक या कार्यालयाला भेट देतात.


एखाद्या विभागाशी संबंधित आपली तक्रार असल्यास तो विभाग शोधण्यापासून ते तक्रार दाखल केल्यानंतर त्या तक्रारीचा फॉलोअप घेण्यासाठी नागरिकांना वारंवार म्हाडा मुख्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे डिसेंबरपासून म्हाडा मुख्यालयातील गेट क्रमांक ४ येथे या केंद्राच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. नागरी सुविधा केंद्राचे काम मार्चच्या अखेरीस पूर्ण होऊन एप्रिलपासून हा कक्ष सुरु होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.


नागरिकांचे तक्रार अर्ज, टपाल येथे या केंद्रावर एकाच ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्यानंतर आलेल्या अर्जांचे वर्गीकरण करून ते अर्ज संबंधित विभागाला पाठवण्यात येईल. त्या अर्जाचा पाठपुरावा देखील नागरिकांना याच केंद्रावर घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांची पायपीट थांबणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Garbage-Free : पुढील चार वर्षांत मुंबई कचरापेट्या मुक्त?

- सार्वजनिक कचरा पेट्या हटवून घरोघरी कचरा उचलण्यावर दिला जाणार भर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील कचरा

Kala Ghoda : काळा घोडा परिसराच्या आता दुसऱ्या टप्प्यात होणार सुशोभिकरण

महापलिकेच्यावतीने ९.२३ कोटींची निविदा जारी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काळा घोडा परिसर विकास प्रकल्पाच्या पहिल्या

Raksha Bandhan : दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या २ हजारांहून राख्यांची विक्री

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या कल्पकतेने आणि स्वहस्ते साकारलेल्या राख्या घेऊन

Mumbai Hawkers QR Code ID Card : क्यु आर कोड ओळखपत्रानंतरही फेरीवाले चिंतेत

- रेल्वेस्थानकासह काही भाग मोकळे सोडून व्यवसाय करण्यास मुभा,तरीही कारवाईची टांगती तलवार मुंबई (विशेष

Mumbai Auto-Taxi Fare : रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार! मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार

मुंबई : महागाईने आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या खिशावर आता रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा भार पडणार आहे. 1

Mumbai Metro 7A : MMRDA चा अजब कारभार! २६० कोटींचा मेट्रो पूल आता पाडणार? २.५ मीटरच्या उंचीने काम अडचणीत

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मेट्रो प्रकल्पासंदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.