Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील त्या जप्त मालमत्तांचा होणार फेरलिलाव

कल्याण  : मालमत्ता कर उत्त्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. मालमत्ता कर थकीत ठेवणा-या मिळकतधारकांना कराचा भरणा करणेबाबत वारंवार नोटीस पाठवनूही त्यास प्रतिसाद मिळत नाही. याची गंभीर दखल घेवून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने १/अ, २/ब व ३/क प्रभागातंर्गत १५ मालमत्ता जप्त केल्या असून, त्याचा लिलाव १७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आला. सदर लिलावास प्रतिसाद मिळालेला नसल्याने, या मिळकतींचा फेरलिलाव काढण्यात येणार आहे.



नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा वेळेत व नियमित करावा यासाठी महानगरपालिकेकडून वेळोवेळी आवाहन केले जाते.मात्र,अनेक मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर थकवला जातो. मालमत्ता जप्तीची कारवाई करुनही थकबाकी न भरता नोटीसला प्रतिसादही दिला जात नाही. अशा,थकबाकीदारांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याची कारवाई सुरु आहे.थकीत मालमत्ता कराबाबत सातत्याने जप्ती/अटकावणी व लिलावाची कारवाई महानगरपालिकेतर्फे केली जाते. तरी, अशी कठोर कारवाई टाळण्याकरीता नागरीकांनी मालमत्ता कराचा भरणा त्वरीत करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने