जगाला हेवा वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारणार : पालकमंत्री नितेश राणे

किल्ले राजकोट येथे महाराजांच्या पुतळ्याचा 'पायाभरणी समारंभ' थाटात


मालवण : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट येथे उभारण्यात येणारा पुतळा जगाला हेवा वाटेल असा भव्य दिव्य असेल. जगभरातून पर्यटक,शिवप्रेमी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी येतील, असे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवण येथील किल्ले राजकोट येथे व्यक्त केले.


महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य स्वरूपातील तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारणी होत आहे. शिवजयंती दिनी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराजांचा पुतळा उभारणी कामाचा पायाभरणी सोहळा संपन्न झाला.



यावेळी जेष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, आ. दीपक केसरकर, आ.निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आदी उपस्थित होते. यावेळी कोनशीलेचे अनावरणही करण्यात आले. महाराजांचा पुतळा उभारणी करणारे मे. राम सुतार आर्ट क्रियेशन वतीने महाराजांची प्रतिकृती पालकमंत्री नितेश राणे यांना भेट देऊन सत्कार करण्यात आला.


पालकमंत्री म्हणाले, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बनविण्यात येणार आहे तो कसा बनतोय, कोण बनवतोय याची सविस्तर माहिती महाराष्ट्रातील जनतेच्या समोर मांडावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. महाराष्ट्रातील जनतेचीच नाही तर संपुर्ण जगाचे लक्ष या कार्यक्रमाकडे आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्यांची किर्ती संपुर्ण जगभर प्रसिध्द आहे. हा सोहळा शासन प्रतिनिधी म्हणून आमच्या माध्यमातून होतोय याबद्दल आम्ही सर्वजण स्वत:ला नशिबवान समजतो असेही ते म्हणाले.


पालकमंत्री म्हणाले की, हा पुतळा जगविख्यात ज्येष्ठ मुर्तीकार राम सुतार बनविणार आहेत. त्यांच्या कामाबद्दल फक्त महाराष्ट्रात नाही तर संपुर्ण जगभरामध्ये कौतुक आहे.


गुजरात मध्ये असणारा सरदार वल्लभ भाई पटेलांचा 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' म्हणून ओळखला जाणारा भव्य पुतळा देखील राम सुतार यांनी बनविलेला आहे. शिवाय दादर येथील इंदू मिल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्मारक उभं राहणार आहे ते देखील राम सुतारच उभारणार आहेत. अशा या महान व्यक्तीकडून आपण हा पुतळा उभारणार आहोत. या पुतळा उभारणीमध्ये महाराष्ट्र शासन कमी पडणार नाही याची काळजी शासनाकडून घेण्यात येत आहे.


आमदार निलेश राणे यांनी महाराजांचा पुतळा उभारणी नंतर सुरक्षिततेबाबत, तटबंदीबाबत तसेच या भागाच्या विकासासाठी सूचना केलेल्या आहेत. मी त्यांना विश्वास देतो की,त्यांनी केलेल्या सर्व सुचनांची पुर्तता करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. राजकोट परिसरातील सुरक्षितता, सुशोभिकरण या सर्व गोष्टीवर फार बारकाईने लक्ष देणे महत्वाचे आहे.आमदार दिपक केसरकर यांच्या सूचनेनूसार पुतळ्याचा बाजूला 'शिवसृष्टी' उभा केली तर पुतळा पाहण्यासाठी जे शिवप्रेमी येथे येतील त्यांना शिवरायांचा इतिहास व शिवरायांबद्दल जास्तीत जास्त माहिती उपलब्ध होईल. या परिसरामध्ये ते जास्तीत जास्त वेळ कसे थांबतील या दृष्टीकोनातून 'शिवसृष्टी' हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. त्यासाठी प्रशासन बैठका घेत आहे. संबंधित जमीन मालकांसोबतही चर्चा सुरु आहे. पुतळा उभारणीचे काम पुर्ण झाल्यानंतर लगेच 'शिवसृष्टी' उभा करण्याचे कामही सुरु होईल असा विश्वासू मी देतो असेही ते म्हणाले.




सर्वोत्तम दर्जा पाहता मोठया दिमाखात महाराजांचा पुतळा उभारणी होईल : आमदार निलेश राणे

ज्या दैवतामुळे आपली ओळख आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीला कळावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आमदार निलेश राणे म्हणाले. राजकोट येथे मागील वर्षी जी दुर्घटना घडली तो घातपात होता.आता महाराजांचा पुतळा उभारणीनंतर परिसरातील सुरक्षेसाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. या परिसरात पेालीस बंदोबस्त,लाईट आणि सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे,असेही ते म्हणाले. तसेच आता महाराजांचा पुतळा उभारणी होत असताना जो सर्वोत्तम दर्जा पाहता मोठया दिमाखात हा पुतळा उभा राहील, असाही विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही