छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आराखड्यास मान्यता

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पाठपुराव्यास यश


श्रीरामपूर : शहरात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याच्या आराखड्यास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्र विभागाने तसेच पुतळ्याच्या प्लेमॉडेललाही कला संचलनालयाची मान्यता मिळाल्याने स्मारकाच्या कामातील मार्ग निर्वेध झाला आहे.
शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून शिवप्रेमींची होती. यासाठी हिंदूत्ववादी संघटनांची आंदोलनही झाली.


यासर्व पार्श्वभूमीवर जिल्हा अध्यक्ष नितिन दिनकर व तालुका भाजपा पदाधिकारी यानी ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कड़े पत्र व्यवहार करुन स्मारकाच्या कामाचा पाठपुरावा केला होता. ना विखे पाटील यांनी तात्काळ दखल घेताली व निधी उपलब्धता करुन देतानाच जागेची निश्चिती केली. स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. स्मारकाच्या उभारणीसाठी शासन स्तरावर आवश्यक असलेल्या मान्यता मंत्री विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपालिकेस प्राप्त झाल्याने, स्मारकाच्या उभारणीतील अडथळे दुर झाले आहेत.



स्मारकासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्र विभागाची परवानगी आवश्यक होती. यासाठी मंत्री विखे पाटील यांनी पाठपुरावा करुन, ही मान्यता तातडीने मिळविण्यासाठी प्रयत्न केले. या विभागाने स्मारकाच्या चबुत-याच्या आराखड्यास मान्यता दिल्याचे पत्रही नगरपालिका प्रशासनास मुख्य वास्तु शास्त्रज्ञ चेतन आक्रे यांनी पाठविले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याची मान्यताही शासनाच्या कला संचलनालयाने दिली आहे. आश्वारुढ पुतळ्याच्या शिल्पकारास दिलेल्या सुचने प्रमाणे फायबरच्या तयार केलेल्या मॉडेलमध्ये सुधारणा करुन, त्याचे रुपांतर ब्राँझ धातू मध्ये करण्यासाठी संचलनालयाने मान्यता दिल्याचे कळविल्याने शहरातील आश्वारुढ पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.


शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरच आश्वारुढ पुतळ्याच्या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व मान्यता मिळाल्याने शिव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्मारकाचे काम लवकरच सुरु होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
स्मारकाच्या कामासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्या बद्दल महायुतीच्या पदाधिका-यांनी अभिनंदन करुन आभार मानले आहेत. भाजपा जिल्हा अध्यक्ष नितिन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे तसेच सर्व हिंदूत्ववादी संघटनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला