Chhava Movie : आता सर्व महिलांना मोफत बघता येणार 'छावा' चित्रपट

  286

अहिल्यानगर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा हिंदी चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात हाऊसफुल आहे.अशातच आता महिलांना हा चित्रपट मोफत पाहता येणार आहे.


'छावा' चित्रपट प्रत्येक भारतीय नागरिका ला पाहता आला पाहिजे यासाठी नगर शहर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी खास सर्वसामान्य महिलांसाठी मल्टीप्लेक्स थेटरमध्ये मोफत चित्रपट पाहण्याची सोय केली आहे. याने सर्व महिलांना चित्रपटाचा मोफत लाभ घेता येणार आहे. हा चित्रपट महिला सोमवार (१७ फेब्रुवारी ) पासून ते रविवार( २३फेब्रुवारी )पर्यंत मोफत पाहू शकतात. तसेच 'छावा' चित्रपट हा कर मुक्त करावा अशी मागणीही आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. ही सुविधा तुम्हाला फक्त अहिल्यानगरमध्ये मिळणार आहे.



'छावा' चित्रपट प्रदर्शित होऊन तीनच दिवस झालेत. मात्र त्याची कमाई ही तब्बल १०० कोटींच्या वरचा टप्पा गाठताना दिसत आहे. या चित्रपटाला सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी छावा चित्रपटाने ३३.१ कोटींचा टप्पा पार केला. तर दुसऱ्या दिवशी ३९.३ कोटींचा टप्पा पार केला. त्यासह तिसऱ्या दिवशी ४८.६ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत