Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीChhava Movie : आता सर्व महिलांना मोफत बघता येणार 'छावा' चित्रपट

Chhava Movie : आता सर्व महिलांना मोफत बघता येणार ‘छावा’ चित्रपट

अहिल्यानगर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा हिंदी चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात हाऊसफुल आहे.अशातच आता महिलांना हा चित्रपट मोफत पाहता येणार आहे.

‘छावा’ चित्रपट प्रत्येक भारतीय नागरिका ला पाहता आला पाहिजे यासाठी नगर शहर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी खास सर्वसामान्य महिलांसाठी मल्टीप्लेक्स थेटरमध्ये मोफत चित्रपट पाहण्याची सोय केली आहे. याने सर्व महिलांना चित्रपटाचा मोफत लाभ घेता येणार आहे. हा चित्रपट महिला सोमवार (१७ फेब्रुवारी ) पासून ते रविवार( २३फेब्रुवारी )पर्यंत मोफत पाहू शकतात. तसेच ‘छावा’ चित्रपट हा कर मुक्त करावा अशी मागणीही आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. ही सुविधा तुम्हाला फक्त अहिल्यानगरमध्ये मिळणार आहे.

‘कोस्टल रोड परिसरातील खेळाचे मैदान विकसित करा’

‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन तीनच दिवस झालेत. मात्र त्याची कमाई ही तब्बल १०० कोटींच्या वरचा टप्पा गाठताना दिसत आहे. या चित्रपटाला सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी छावा चित्रपटाने ३३.१ कोटींचा टप्पा पार केला. तर दुसऱ्या दिवशी ३९.३ कोटींचा टप्पा पार केला. त्यासह तिसऱ्या दिवशी ४८.६ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -