खोटे बोलून, खोटी ओळख दाखवून लग्न करणे चुकीचे - देवेंद्र फडणवीस

  47

नागपूर: खोटे बोलून आणि खोटी ओळख दाखवून लग्न करणे चुकीचे आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लव्ह जिहाद' कायद्याचे रविवारी समर्थन केले. नागपूर येथे पत्रकारांशी बोलत असताना फडणवीस यांनी लव्ह जिहाद विरोधात महायुती सरकार कडक कार्यवाही करणार असल्याचा मानस व्यक्त केला. राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयात ही घोषणा करण्यात आली असून समितीचे सदस्य कोण असतील, त्याची कार्यपद्धती कशी असेल? याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले. याबाबत अधिक बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लव्ह जिहाद याची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आली आहे.


केरळ उच्च न्यायालयानेही याचा उल्लेख केला आहे. एका धर्मातील व्यक्तीने दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यात गैर काही नाही. पण खोटे बोलून, खोटी ओळख तयार करून, फसवणूक करून लग्न करायचे आणि मुले जन्माला घालून सोडून द्यायचे, ही प्रवृत्ती समाजात पसरत आहे. जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे योग्य नाही. त्यामुळे यासंदर्भात जी काही कार्यवाही असेल ती राज्य सरकारकडून केली जाईल.


दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही आता लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याविरुद्ध कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी सरकारने राज्य पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली. ही समिती लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतर थांबवण्यासाठी कायदेशीर उपाययोजना सुचवणार आहे.


महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आलंय. इतर अनेक राज्यांमध्येही राज्य सरकारांनी कथित लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर थांबवण्यासाठी पावले उचललीत आणि आता महाराष्ट्रदेखील यात सामील होणार आहे.



जबरदस्तीने धर्मांतर रोखण्यासाठी समिती उपाय योजणार


लव्ह जिहाद हा शब्द अनेकदा उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आणि संघटना वापरतात, असा आरोप बऱ्याचदा केला जातो. मुस्लीम पुरुषांकडून हिंदू मुली किंवा महिलांशी लग्न करून त्यांना इस्लाम धर्मात रूपांतरित करणे म्हणजेच लव्ह जिहाद असल्याचे बोलले जाते.


महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या समितीमध्ये महाराष्ट्राचे डीजीपी, महिला आणि बाल कल्याण विभाग, अल्पसंख्याक विभाग, कायदा आणि न्याय विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे उपसचिव यांचा समावेश आहे. राज्य सरकारने शुक्रवारी या संदर्भात आदेश जारी केलेत. आदेशात म्हटले आहे की, अभ्यासानंतर समिती लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मातर करण्याच्या घटनांना सामोरे जाण्यासाठी कोणते उपाय योजता येतील हे सांगणार आहे. ही समिती इतर राज्यांमधील यासंबंधीच्या कायद्यांचाही अभ्यास करणार असून, धर्मातर थांबवण्यासाठी तरतुदीदेखील सुचवेल आणि त्याच्या कायदेशीर पैलूंची सुद्धा चाचपणी केली जाईल.


Comments
Add Comment

गणेशोत्सवात पुण्यात तीन दिवस मद्यविक्री बंद! कोणत्या तारखांना बंदी?

जुन्नर: गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा पुणे शहर

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंवर मराठा आंदोलकांकडून मारहाणीचा प्रयत्न! कुठे घडली घटना? वाचा नेमके काय घडले

पुरंदर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या विरोधात पुरंदर येथे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात

पुरामुळे पिकं झाले उद्ध्वस्त, वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, हृदयद्रावक Video Viral

लातूर: महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली

"सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र..." मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी केलं स्पष्ट

मुंबई: जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी

'गोकुळ'ने दूध खरेदी किंमत आणि छोट्या डेअरींसाठीच्या अनुदानात केली वाढ

कोल्हापूर: गोकुळ डेअरी किंवा गोकुळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने

हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

इगतपुरी: जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांचा परत उतरताना पडून मृत्यू