बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन आमने सामने आलेले भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.
दोषी नाही तर कारवाई नाही म्हणत अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना पाठिंबा!
धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यादिवशी रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं. दुस-या दिवशी झाकून-लपून नाही. तर त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. त्यांच्याविरोधातील लढा आणि भेट या वेगळ्या गोष्टी आहेत. बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल. पर्वा भेटलो ते त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला गेलो होतो. लढ्यामध्ये आम्ही धनंजय मुंडे यांच्या विरोधातच राहणार आहोत. मी धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो तेव्हा फक्त प्रकृतीची चौकशी केली. प्रकृतीची चौकशी करणे यात गैर काय आहे? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लढा आणि प्रकृतीची चौकशी करायला जाणे यात काहीही संबंध नाही. हा संबंध कृपया जोडू नये. आमच्यात कोणीही मध्यस्थी केलेली नाही.
मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो – चंद्रशेखर बावनकुळे
आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो, सुरेश धस आणि धनंजय मुंडे दोघेही होते. दोघांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत. दोघेही इमोशनल आहेत. दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो.