Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीदोषी नाही तर कारवाई नाही म्हणत अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना पाठिंबा!

दोषी नाही तर कारवाई नाही म्हणत अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना पाठिंबा!

मुंबई : धनंजय मुंडेंवरचे आरोप जोपर्यंत सिद्ध होणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली असून दोषी नाही तर कारवाई नाही, असं म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.

CIDCO Lottery : सिडकोच्या घरांसाठी आज सोडत

धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी देवगिरीत झालेल्या बैठकीत अजित पवारांनी ही भूमिका स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी सुरेश धस यांनी अजित पवारांच्या भेटीची मागणी केली होती, मात्र अजित पवारांनी ही भेट नाकारली होती. दरम्यान, देवगिरी बंगल्यावर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसोबत झालेल्या अनौपचारिक बैठकीत अजित पवारांनी ठाम भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, पुरावे जोपर्यंत नाहीत तोपर्यंत पक्ष कारवाई करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलीय.

अटल सेतू शनिवारी रात्री ११ पासून रविवारी दुपारी १ पर्यंत बंद राहणार

गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंवर संतोष देशमुख प्रकरण, वाल्मिक कराडशी असणारे आर्थिक हितसंबंध, कृषीघोटाळ्यावरून आरोप होत आहेत. धनंजय मुंडेंचा राजिनामा घ्यावा असा दबाव वाढत असताना दुसरीकडे करुणा मुंडेंनी ओढलेले ताशेरे आणि वारंवार होणा-या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे. या अनुषंगाने गुरुवारी रात्री देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन तास चर्चा केली. या चर्चदरम्यान धनंजय मुंडेंवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्ष कोणतीही कारवाई करणार नसल्याची भूमिका घेत पुन्हा एकदा अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.

Railway Megablock : प्रवाशांचे होणार हाल! उद्या तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक

एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव विरोधकांनी वाढवला आहे. दरम्यान, करुणा मुंडेंची असलेली न्यायालयीन लढाई पाहता धनंजय मुंडेंवर वारंवार ताशेरे ओढले जात असल्याने पक्षाची प्रचंड बदनामी होत असल्याने गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा नेत्यांची बैठक पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यावर उपस्थित होते. साधारणपणे दोन तास चाललेल्या या बैठकीत जोपर्यंत धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्ष कारवाईची भूमिका घेणार नाही हाच सूर नेत्यांचा होता अशी माहिती सूत्रांनी दिली. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोप प्रत्यारोप तर दुसरीकडे कृषी घोटाळ्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. कृषी घोटाळ्याचा अहवाल येईपर्यंत कोणतीही कारवाई नको अशीच भूमिका नेत्यांनी घेतल्याचं समोर येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -