Wednesday, July 22, 2026

Pune Rain : पुण्यात पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम; घाटमाथ्यावर रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pune Rain : पुण्यात पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम; घाटमाथ्यावर रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे : जुलैच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार पुनरागमन केले आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस पडत असून पुणे जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 3 दिवस पुणे आणि परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. (Pune Rain)
आज पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. शहर आणि आसपासच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र, पुण्याच्या घाटमाथा भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने त्या भागासाठी रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विकेंडला पर्यटनासाठी घाटमाथा किंवा डोंगराळ भागात जाण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (IMD Alert) सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. याचा फायदा शेतीसह पिण्याच्या पाण्यालाही होणार आहे. धरणांमध्ये वाढलेल्या साठ्यामुळे पुणे शहरावरील संभाव्य पाणीटंचाईचे संकटही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Monsoon Update)
दरम्यान, कोकणातील अनेक भाग आणि लगतच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज असल्याने त्या परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, कोकण आणि पुणे परिसरात पडणाऱ्या पावसामुळे प्रमुख धरणांतील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. (Maharashtra Weather) हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर भागात तयार झालेल्या दोन सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या ओलसर वाऱ्यांमुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पुढील 5 दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Heavy Rain)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >