कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत गायब झालेले आजोबा स्वतःच्या तेराव्याला झाले हजर!

लखनऊ : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात दररोज कोट्यवधी भाविक सहभागी होत आहेत. मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळत असल्याने प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली असली तरी त्या सुविधाही अपुऱ्या पडत आहेत. काही दिवसांपूर्वी अमृतस्नानासाठी आलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण बेपत्ता झाले. प्रशासन त्यांना शोधून घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.


ज्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही, अशा लोकांच्या नातेवाईकांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तेरावे विधी केले. मात्र, काहींना अजूनही आप्त जिवंत परत येतील अशी आशा होती. अशीच एक अजब आणि आनंददायक घटना लखनऊमध्ये घडली.



स्थानिक रहिवासी खुंटी गुरु चेंगराचेंगरीत बेपत्ता झाले होते. त्यांचा मृत्यू झाला असावा असे समजून त्यांच्या शेजाऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. तेराव्याच्या दिवशी संध्याकाळी ब्राह्मण भोजनाची तयारी सुरू असताना अचानक खुंटी गुरु स्वतः तिथे हजर झाले! त्यांना पाहताच शेजाऱ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला. काही वेळापूर्वी सुतकी असलेले वातावरण क्षणात आनंदोत्सवात बदलले. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते अभय अवस्थींनी दिली.


खुंटी गुरु यांचे कुटुंब नाही; ते एकटेच राहत होते. मौनी अमावस्याच्या मुहूर्तावर स्नान करण्यासाठी ते २८ जानेवारीला संगमस्थळी पोहोचले होते. २९ जानेवारीला झालेल्या चेंगराचेंगरीत ते हरवले आणि त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर, त्यांच्या मृत्यूचा गैरसमज होऊन शेजाऱ्यांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी छोटेखानी विधी आणि ब्राह्मण भोजनाचे आयोजन केले. पण या सगळ्यात खुंटी गुरु सुखरूप परत येतील, हे कोणालाही वाटले नव्हते!

Comments
Add Comment

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,