कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत गायब झालेले आजोबा स्वतःच्या तेराव्याला झाले हजर!

लखनऊ : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात दररोज कोट्यवधी भाविक सहभागी होत आहेत. मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळत असल्याने प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली असली तरी त्या सुविधाही अपुऱ्या पडत आहेत. काही दिवसांपूर्वी अमृतस्नानासाठी आलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण बेपत्ता झाले. प्रशासन त्यांना शोधून घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.


ज्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही, अशा लोकांच्या नातेवाईकांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तेरावे विधी केले. मात्र, काहींना अजूनही आप्त जिवंत परत येतील अशी आशा होती. अशीच एक अजब आणि आनंददायक घटना लखनऊमध्ये घडली.



स्थानिक रहिवासी खुंटी गुरु चेंगराचेंगरीत बेपत्ता झाले होते. त्यांचा मृत्यू झाला असावा असे समजून त्यांच्या शेजाऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. तेराव्याच्या दिवशी संध्याकाळी ब्राह्मण भोजनाची तयारी सुरू असताना अचानक खुंटी गुरु स्वतः तिथे हजर झाले! त्यांना पाहताच शेजाऱ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला. काही वेळापूर्वी सुतकी असलेले वातावरण क्षणात आनंदोत्सवात बदलले. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते अभय अवस्थींनी दिली.


खुंटी गुरु यांचे कुटुंब नाही; ते एकटेच राहत होते. मौनी अमावस्याच्या मुहूर्तावर स्नान करण्यासाठी ते २८ जानेवारीला संगमस्थळी पोहोचले होते. २९ जानेवारीला झालेल्या चेंगराचेंगरीत ते हरवले आणि त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर, त्यांच्या मृत्यूचा गैरसमज होऊन शेजाऱ्यांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी छोटेखानी विधी आणि ब्राह्मण भोजनाचे आयोजन केले. पण या सगळ्यात खुंटी गुरु सुखरूप परत येतील, हे कोणालाही वाटले नव्हते!

Comments
Add Comment

Madhya Pradesh : भयंकर! कफ सिरप दुर्घटनेनंतर मध्य प्रदेशातील रुग्णालयात औषधात आढळल्या 'अळ्या'

ग्वाल्हेरच्या सरकारी रुग्णालयातील औषधांचा साठा सील मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात 'टॉक्सिक कफ सिरप'मुळे (Toxic Cough Syrup)

Deepika Padukone : दीपिकाची AI मध्ये 'व्हॉइस' एन्ट्री! 'Chat Soon' म्हणत अभिनेत्रीने मिळवला जागतिक प्लॅटफॉर्मवर खास स्थान

सहा देशांसाठी दीपिका पदुकोण बनली इंग्रजी व्हॉइस बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने

पंतप्रधान मोदी १३ हजार ४३० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते १३ हजार ४३० कोटी

'मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल', गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातून नक्षलवाद संपवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांबद्दल

दिल्लीत पर्यावरणपूरक फटाके फोडण्यास मर्यादित परवानगी

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये १८ ते २१ ऑक्टोबर २०२५

महिलांच्या अपहरणामध्ये पश्चिम बंगाल देशात आघाडीवर, महाराष्ट्र कितव्या स्थानावर? धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली: देशभरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विशेषतः महिलांच्या अपहरणाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक