पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Purandar Airport) गती देण्यासाठी राज्य सरकारकडून मेट्रो, रेल्वे, जोड रस्त्यांच्या ‘कनेक्टिव्हिटीला’ प्राधान्य देण्यात आले आहे. त्याअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) अर्थसंकल्प आणि मेट्रोच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात अनेक पर्यायी मार्गांची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा भविष्यातील प्रवास सुकर होण्याची शक्यता आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण २ हजार ५५० चौरस किलोमीटर क्षेत्रासाठीचा एकात्मिक वाहतूक आराखडा करण्यात आला आहे. त्यासाठी १ लाख २६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या एकात्मिक आराखड्यात पुरंदर विमानतळापर्यंतचा ‘कनेक्ट’ वाढविण्यासाठी मेट्रो मार्गिका, पीएमपीचे नवे मार्ग, पीएमपीचे टर्मिनल, रेल्वे जोड मार्गिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पातही पुरंदर विमानतळापर्यंतची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यासाठी अनेक जोड रस्ते, काँक्रिट रस्ते, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाला जोडणारे रस्ते, बाह्यवळण वर्तुळाकार मार्गाला जोडणारे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल ६३६ कोटींचा खर्च येत्या काही वर्षांत पीएमआरडीएकडून करण्यात येणार आहे.
पुरंदर येथील विमानतळावरून प्रवाशांना ये-जा करणे सहज शक्य व्हावे, यासाठी रेल्वेच्या सातारा मार्गावरील राजेवाडी रेल्वे स्थानकापासून विमानतळापर्यंत जोड रेल्वे मार्गिका विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. सातारा रेल्वे मार्गावर प्रस्तावित विमानतळाजवळ जेजुरी आणि राजेवाडी ही दोन रेल्वे स्थानके आहेत. त्यातील राजेवाडी हे स्थानक विमानतळापासून नजीक आहे. त्यामुळे राजेवाडी ते विमानतळ या दरम्यान रेल्वेचा स्वतंत्र मार्ग (स्पूर लाइन) विकसित करण्यात येणार आहे. तसेच तळेगाव आणि दौंड स्थानकांना बाह्यवळण रेल्वे मार्गाने जोडण्याचेही नियोजित आहे. त्यासाठी दोन टप्प्यात कामे होणार असून तळेगाव ते शिक्रापूर या दरम्यान उरूळी कांचनपर्यंत पूरक सेवा (फीडर सर्व्हिस) देण्यात येईल.
पीएमपीच्या माध्यमातूनही विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी झेंडेवाडी ते वनपुरी हा मार्ग काळेवाडी मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच सासवड येथील पीएमपीच्या टर्मिनलचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे. सात इंटर बस टर्मिनलही सासवड येथे असणार आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…