बनावट गुडनाइट फ्लॅश तयार करुन किराणा दुकानांना पुरविणाऱ्यावर कारवाई

  92

मुंबई : बनावट गुडनाइट फ्लॅश उत्पादने तयार करून ती किराणा दुकानांना पुरविणाऱ्या आशिष अंदाभाई चौधरीवर कारवाई करण्यात आली आहे. गुडनाइटसारखा प्रसिद्ध ब्रँड असलेल्या आणि घरगुती कीटकनाशक श्रेणीतील आघाडीचा ब्रँड असलेल्या गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) ने मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली आहे. गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी महाराष्ट्रातील वसईजवळील उत्पादन केंद्रावर छापा टाकला आणि कारवाई केली.
या छाप्यात मोठ्या प्रमाणात बनावट साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामध्ये सुमारे ५० हजार गुडनाइट फ्लॅशच्या रिकाम्या बाटल्या, ५० हजार गुडनाइट फ्लॅशच्या पॅकिंग कार्टन्स आणि ६ हजार गुडनाइट विक्स यांचा समावेश आहे. या प्रकरणी १९५७ च्या कॉपीराइट कायद्याच्या कलम ६३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये बनावट उत्पादन निर्मिती आणि कॉपीराइट उल्लंघनाचा समावेश आहे. मुंबई पोलिसांचा तपास सुरू असून, या बनावट उत्पादनांच्या वितरण जाळ्याचा शोध घेऊन संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या ठोस कारवाईमुळे भविष्यात बनावट उत्पादनांची विक्री रोखली जाईल आणि ग्राहकांना केवळ अस्सल व सुरक्षित गुडनाइट उत्पादने मिळावित याची खात्री केली जाईल.
या प्रकरणावर भाष्य करताना गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL)च्या होम केअर विभागाच्या मार्केटिंग प्रमुख शिल्पा सुरेश यांनी सांगितले की, बनावट उत्पादनांचा प्रसार हा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी, तसेच FMCG उद्योगाच्या विश्वासार्हतेसाठी मोठा धोका आहे. अशी नकली उत्पादने केवळ बेकायदेशीरच नाहीत, तर ती मानवी आरोग्यास हानिकारकही ठरू शकतात. GCPL आपल्या ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी आणि अस्सल व सुरक्षित उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही आमच्या वितरण जाळे, स्थानिक प्रशासन आणि ग्राहकांच्या सहकार्याने नियमित गुणवत्ता तपासणी करतो. मुंबई पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या या यशस्वी कारवाईमुळे बनावट उत्पादनांविरोधातील आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना बळ मिळाले आहे आणि ग्राहकांचा गुडनाइट ब्रँडवरील विश्वास दृढ राहील." बाजारात बनावट गुडनाइट उत्पादने आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर, GCPL ग्राहकांना सावध राहण्याचे आणि केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन करते. ग्राहकांनी खरेदीच्या दरम्यान खरी विक्री पावती (Sales Invoice) घ्यावी आणि बनावट गुडनाइट उत्पादने आढळल्यास किंवा असे उत्पादने विकणारे घाऊक/किरकोळ विक्रेते दिसल्यास त्वरित GCPL कडे तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदविण्यासाठी care@godrejcp.com वर ईमेल पाठवा किंवा 1800-266-0007 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा.
Comments
Add Comment

Independence Day 2025: मंत्रालयात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:

मुंबईत दीड लाख नागरिकांना दरवर्षी भटक्या श्वानांचा दंश

निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी मुंबई : दिल्लीतील भटक्या

कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अध

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही