Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजव्यापार ते दहशतवाद...ट्रम्प यांनी केल्या अनेक घोषणा, मोदींनी भारतात येण्याचे दिले आमंत्रण

व्यापार ते दहशतवाद…ट्रम्प यांनी केल्या अनेक घोषणा, मोदींनी भारतात येण्याचे दिले आमंत्रण

वॉशिंग्टन डीसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चेनंतर पत्रकार परिषद घेतली.येथे त्यांनी दोन्ही देशांदरम्यान झालेल्या विविध करारांबाबत माहिती दिली. तसेच पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरेही दिली. पंतप्रधान म्हणाले, २०३० पर्यंत भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार दुपटीने वाढवणार. तर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना स्वत:पेक्षा चांगला नेगोशिएटर असल्याचे सांगितले आहे.

घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले, सगळ्यात आधी माझे प्रिय मित्र राष्ट्रपती ट्रम्प यांनी केलेल्या शानदार स्वागत आणि आदरातिथ्यासाठी मी आभार व्यक्त करतो. राष्ट्रपती ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधांना आपल्या नेतृत्वात जिवंत केले आहे. दहशतवादाशी लढण्यासाठी आम्ही सहकार्य करू.

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

सीमेच्या पलीकडे दहशतवादाविरोधात कडक कारवाईची गरज आहे. २६/११चे दहशतवादी तहव्वूर राणाच्या प्रत्यापर्णाचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती ट्रम्पचे आभार मानतो. आमची न्यायालये त्याला न्यायाच्या कोठडीत आणतील. आमच्या मते भारत आणि अमेरिका एकत्र सहकार्याने एका चांगल्या जगाला आकार देऊ शकतात.

विकासाच्या दिशेने अग्रेसर आहे भारत- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान म्हमाले, अमेरिकेच्या लोकांना राष्ट्रपती ट्रम्प यांचा मोटो, मेक अमेरिकन ग्रेट अगेन म्हणजेच MAGA याबद्दल माहिती आहे. भारताचे लोकही परंपरा आणि विकासाच्या रूळावर विकसित भारत २०४७चा दृढ संकल्प हाती घेऊन वेगाने शक्तीने विकासाच्या दिशेने अग्रेसर आहेत. अमेरिकेच्या भाषेत म्हणायचे झाले विकसित भारताचा अर्थ Make India Great Again म्हणजे MIGA. जेव्हा अमेरिका आणि भारत एकत्र मिळून काम करतात म्हणजेच MAGA आणि MIGA तेव्हा बनते MEGA Partnership for prosperity.’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -