वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित भेटीपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मायकेल वॉल्ट्झ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीनंतर वॉल्ट्झ वॉशिंग्टन डीसीमधील ब्लेअर हाऊसमध्ये पोहोचले. या बैठकीला परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल देखील उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांची देखल भेट घेतली. या भेटीनंतर मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट प्रस्तावित आहे.
#WATCH | The bilateral meeting between PM Narendra Modi and US National Security Advisor Michael Waltz begins at Blair House in Washington, DC.
EAM Dr S Jaishankar and NSA Ajit Doval are also in the meeting.
(Video: ANI/DD) pic.twitter.com/zG83CwKC6c
— ANI (@ANI) February 13, 2025
पंतप्रधान मोदी यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार ते भारतीय वेळेनुसार रात्री २.२० वाजता ग्लेअर हाऊस सोडतील आणि अडीच वाजता व्हाईट हाऊसला पोहचतील. त्यानंतर २ वाजून ३५ मिनिटांनी पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. याभेटीनंतर दोन्ही नेते ३.४० वाजता संयुक्त प्रेस वक्तव्य जारी करतील आणि ४ वाजून १० मिनीटांनी सहभोजन प्रस्तावित आहे. ट्रम्प यांनी अमेरिकन सत्ता हाती घेतल्यानंतर होणाऱ्या या विशेष बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर अनेक मोठ्या घोषणांची अपेक्षा आहे.