मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत आहे. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे. भारताचे साखळी फेरीतील सर्व सामने दुबईत होणार आहेत. पण स्पर्धेआधी बीसीसीआयने एका नव्या नियमाची घोषणा केली आहे. या नियमानुसार भारतीय खेळाडू त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन जाऊ शकणार नाहीत. हॉटेलमध्येही खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना एकत्र राहता येणार नाही. बीसीसीआयचे हे नवे धोरण लगेच लागू करण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या नव्या धोरणानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमाच्या निमित्ताने ४५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळाच्या दौऱ्याच्या वेळी कुटुंबातील सदस्य खेळाडूंसोबत जास्तीत जास्त दोन आठवडे राहू शकतील. एरवी खेळाडू त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन दौरा करू शकत नाहीत. या नियमात बदल करायचा की नाही याचे सर्वाधिकार बीसीसीआयकडेच आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच झालेल्या बॉर्डर – गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत भारताचा पराभव झाला. मालिका ऑस्ट्रेलियाने ३ – १ अशी जिंकली. यानंतर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी नवे धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ind vs Eng: टी-२० नंतर वनडेतही भारताची बाजी, इंग्लंडला दिला व्हाईटवॉश
अ गट – बांगलादेश, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान
ब गट – अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, या खेळाडूंचा समावेश
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती
IND vs END : किंग कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा महान विक्रम!
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे वेळापत्रक (भारताचे सर्व साखळी सामने दुबईत होणार)
Sanju Samson : संजू सॅमसनच्या हाताच्या बोटावरील शस्त्रक्रिया यशस्वी
१९ फेब्रुवारी – कराची – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड
२० फेब्रुवारी – दुबई – बांगलादेश विरुद्ध भारत
२१ फेब्रुवारी – कराची – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२२ फेब्रुवारी – लाहोर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
२३ फेब्रुवारी – दुबाई – पाकिस्तान विरुद्ध भारत
२४ फेब्रुवारी – रावळपिंडी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड
२५ फेब्रुवारी – रावळपिंडी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२६ फेब्रुवारी – लाहोर – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड
२७ फेब्रुवारी – रावळपिंडी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
२८ फेब्रुवारी – लाहोर – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१ मार्च – कराची – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड
२ मार्च – दुबई – न्यूझीलंड विरुद्ध भारत
४ मार्च – दुबई – पहिला उपांत्य सामना अ १ विरुद्ध ब २
५ मार्च – लाहोर – दुसरा उपांत्य सामना ब १ विरुद्ध अ २
९ मार्च – अंतिम सामना