Wednesday, March 26, 2025
Homeक्रीडाRCB ला IPL 2025 साठी मिळाला नवा कर्णधार

RCB ला IPL 2025 साठी मिळाला नवा कर्णधार

बंगळुरू : आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे. विराट कोहली आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळाडू म्हणून सहभागी होणार आहे. तो संघाचे नेतृत्व करणार नाही.

Ind vs Eng: टी-२० नंतर वनडेतही भारताची बाजी, इंग्लंडला दिला व्हाईटवॉश

रजत पाटीदार २०२१ पासून आयपीएल खेळत आहे. त्याने २०२१ ते २०२४ या कालावधीत २७ आयपीएल सामने खेळून ७९९ धावा केल्या आहेत. यात नाबाद ११२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने आयपीएलमध्ये एक नाबाद शतक आणि सात अर्धशतके केली आहेत. आयपीएलमधील कारकि‍र्दीत त्याने ५४ षटकार आणि ५१ चौकार मारले आहेत.

IND vs END : किंग कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा महान विक्रम!

स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारा आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारा रजत पाटीदार हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज आहे.

शांत स्वभावाचा रजत पाटीदार हा २०२१ पासून आरसीबीसोबत आहे. कामगिरीच्या जोरावर त्याने संघातील स्वतःचे स्थान बळकट केले आहे. आयपीएल २०२५ च्या लिलावाआधी त्याला आरसीबीने रिटेन करण्यासाठी ११ कोटी मोजले होते. रजत पाटीदार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळतो. आता झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वात मध्य प्रदेशने फायनल गाठली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये दहा सामन्यात ६१.१४ च्या सरासरीने रजतने ४२८ धावा काढल्या होत्या. यामध्ये त्याने ५ अर्धशतके केली होती. त्याने ३१ षटकार आणि ३२ चौकार मारले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -