Tuesday, March 18, 2025
Homeक्रीडाInd vs Eng: टी-२० नंतर वनडेतही भारताची बाजी, इंग्लंडला दिला व्हाईटवॉश

Ind vs Eng: टी-२० नंतर वनडेतही भारताची बाजी, इंग्लंडला दिला व्हाईटवॉश

अहमदाबाद: टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतही बाजी मारली आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला ३-० असा व्हाईटवॉश दिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता.

या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३५७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला हे आव्हान गाठता गाठता दमछाक झाली. इंग्लंडच्या संघाला ३४.२ षटकांत केवळ २१४ इतक्याच धावा करता आल्या.भारताने हा सामना तब्बल १४२ धावांनी जिंकला.

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात धमाकेदार झाली. बेन डकेट आणि फिल सॉल्टने ६.२ षटकांत ६० धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर अर्शदीपने ही भागीदारी तोडली. त्याने दोन्ही खेळाडूंना बाद केले. यानंतर टॉम बँटनने आणि जो रूटने तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावा केल्या. कुलदीप यादवने बँटनला बाद करत ही भागीदारीही तोडली. त्यानंतर अक्षऱ पटेलने अनुभवी ज्यो रूटला २४ धावांवर आणि हर्षित राणाने कर्णधार जोस बटलरहा ६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

तत्पूर्वी, टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने ५० षटकांत ३५६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नव्हती. गेल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलने ५१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले तर विराट कोहलीने ५० बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. कोहलीच्या वनडे करिअरमधील हे ७३वे अर्धशतक होते.

शुभमन गिलनेही आपल्या करिअरमधील ७वे वेगवान शतक ठोकले. त्याने याआधीच्या दोन सामन्यांमध्येही चांगली खेळी केली होती. फलंदाजांनंतर गोलंदाजीमध्येही भारताने कमाल केली. भारतासाठी अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २ विकेट घेत चांगली कामगिरी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -