Thursday, January 15, 2026

26/11चा आरोपी तहव्वूर राणाचे अमेरिकेकडून भारताकडे हस्तांतरण होणार

26/11चा आरोपी तहव्वूर राणाचे अमेरिकेकडून भारताकडे हस्तांतरण होणार
वॉशिंग्टन डी. सी. : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी गुरुवारी दौऱ्यादरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर भारत आणि अमेरिका यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढले. दोन्ही देशांनी संरक्षण, संशोधन, व्यापार अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला. अतिरेक्यांच्या विरोधात सुरू असलेली लढाई आणखी तीव्र करण्याचाही निर्णय दोन्ही देशांनी घेतला. याप्रसंगी बोलताना ट्रम्प यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याला भारताकडे हस्तांतरित करणार असल्याचे जाहीर केले. तहव्वूर राणा हा जगातील अतिशय वाईट प्रवृत्तीच्या लोकांपैकी एक असल्याचेही ट्रम्प म्हणाले.
तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यावसायिक आहे. त्याने व्यावसायिक कारण देत भारताचा दौरा केला. ताज, ओबेरॉयमध्ये राहून मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केली. तहव्वूर राणाच्या अतिरेकी हल्ल्यातील सहभागाबाबतचे पुरावे भारत सरकारने अमेरिकेला दिले आहेत. हे पुरावे हाती आल्यानंतर ट्रम्प यांनी तहव्वूर राणाचा ताबा भारताला देणार असल्याची घोषणा केली आहे.
Comments
Add Comment