Best Bus Price Hike : 'बेस्ट'चा प्रवास महागणार! तिकीट दरात होणार दुप्पट वाढ  

मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरचे दर वाढवण्यात आले होते. १ फेब्रुवारीपासून मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली होती. तर कूल कॅबच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास महाग होत चालला आहे. अशातच आता बेस्ट बसचाही (Best Bus) प्रवास महागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मुंबईकरांसाठी लोकल नंतर बेस्ट बस प्रवासाचे प्रमुख साधन आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बेस्ट सेवात होणारा तोटा, कर्मचाऱ्यांची देणी आणि मुंबई महापालिकेकडे सातत्याने करावी लागणारी आर्थिक मदतीची मागणी या पार्श्वभूमीवर तिकीट दर दुप्पट करण्याचा विचार केला जात आहे. (Best Bus Price Hike)



बेस्टच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी काल बेस्ट अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाडेवाढ व बेस्टमधील बसचा ताफा या बाबत माहिती घेतली. यावेळी बेस्टचा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ हा एकमेव उपाय असून यावर आणखी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे बैठकीत ठरले. नव्या दरानुसार बेस्ट बसचे भाडे हे १० रुपये तर एसी बसचे भाडे १२ रुपये करावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे.


सध्या बेस्ट तोट्यात असून हा तोटा भरून काढण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. या सोबतच कर्मचाऱ्यांची देणी बेस्टला द्यायची आहे. त्यामुळे भाडेवाढीवर विचार सुरू आहे. या बाबत अद्याप निर्णय झाला नाही, अशी माहिती एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. (Best Bus Price Hike)



पीएमपीएलच्या ताफ्यात वाढ


पुण्यात देखील पीएमपीएलच्या ताफ्यात वाढ करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडसाठी तब्बल १ हजार बस घेतल्या जाणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडुन ५०० बस विकत घेतल्या जाणार आहे. पुणे आणि पिंपरीसाठी तब्बल ६००० बसची गरज आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग