दहावी-बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा ग्रेसगुण अर्ज

ठाणे (प्रतिनिधी): प्रतिवर्षी इयता १० वी व १२ वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा ग्रेसगुण प्रस्ताव ऑफलाईन अर्ज मागविले जात होते व त्या माहितीचे संकलन कार्यालयाद्वारे करण्यात येऊन ते गुण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मंडळात पाठविले जात असतात. या शैक्षणिक वर्षापासून ग्रेस गुणासाठी केली जाणारी प्रक्रिया “आपले सरकार” प्रणालीद्वारे ऑनलाईन करण्यात येणार आहे. तसेच या पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा शासनातर्फे निर्माण करून देण्यात आली आहे. यावर्षीपासून जिल्ह्यातील सर्व खेळाडू विद्यार्थी, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी “आपले सरकार” या प्रणालीद्वारे सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा प्राविण्य प्रमाणपत्राच्या सवलत गुणांसाठी केवळ ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जाची प्रत शिक्षण मंडळासही प्रणालीद्वारे आपोआप पाठविली जाईल. त्यासंदर्भात कोणत्याही खेळाडूने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अथवा शिक्षण मंडळास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू नये. अशा प्रकाराचे ऑफलाईन अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून स्वीकारला जाणार नाहीत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० मार्च असून विहित मुदतीत सर्व खेळाडू विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने “आपले सरकार” या प्रणालीवर सादर करावेत, असे आवाहन ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.
Comments
Add Comment

Hinjawadi-Shivajinagar Metro: स्थानके अजूनही 'यार्डातच'; अपूर्ण कामांमुळे पुणेकरांच्या आशा मावळल्या

PUNE : हिंजवडी आयटी हबला दिलासा देण्यासाठी प्रस्तावित असलेला हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प गेल्या अनेक

JALGAON CRIME : लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर दोन वर्षे अत्याचार; संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

JALGAON: लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर गेल्या दोन वर्षांपासून जळगाव आणि धुळे परिसरात शारीरिक व

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घरभाडे भत्ताही वाढवणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Chhatrapati Sambhajinagar : १५ वर्षांचं प्रेम अवघ्या ७ दिवसांत संपलं; नवविवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यात टचकन पाणी येईल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच

Uri Blast : 'उरी'मध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची गाडी अडकली! राज्यात उकाड्याचा कहर कायम; ‘या’ कारणामुळे पाऊस पुढे सरकेना

मुंबई : महाराष्ट्रात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून राज्यातील