मीरा - भाईंदर महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामावर परिणाम

भाईंदर (वार्ताहर): मीरा-भाईंदर महानगरपालिकेत आकृतीबंधानुसार मंजूर असलेल्या पदांच्या संख्येपैकी कार्यरत असलेल्या पदांच्या इतकीच रिक्त पदांची संख्या असल्याने त्याचा विपरीत परिणाम प्रशासकीय कामावर तर होत आहे त्याचबरोबर कार्यरत पदावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे.



महापालिकेत वर्ग १ ते ४ अशा संवर्गाची आकृतीबंधा नुसार २५७० मंजूर पदे आहेत. त्यातील १२३४ पदे कार्यरत आहेत तर १३३६ पदे रिक्त आहेत. वर्ग १ मधील रिक्त पदांमध्ये अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग प्रसूती तज्ञ, वर्ग २ मध्ये अग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक आयुक्त, प्रशासकीय अधिकारी, वर्ग ३ मध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, वाहन चालक तर वर्ग ४ मध्ये मजूर, रखवालदार अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांच्या कामावर मोठा परिणाम होत आहे. कार्यरत पदांवरील काही जणांना पदोन्नती मिळाल्याने तर काहीजण सेवा निवृत्त झाल्यामुळे तसेच काहीजणांचे निधन झाल्याने रिक्त पदात वेळोवेळी वाढ होत गेली. तसेच मीरा-सभाईंदर शहर सुध्दा वेगाने वाढत गेले. त्यामुळे महापालिका कामात सुद्धा प्रचंड वाढ झाली. परिणामी रिक्त पदांची उणीव प्रकर्षाने भासू लागली. तसेच त्याचा विपरीत परिणाम प्रशासकीय कामावर तर होत आहे त्याचबरोबर कार्यरत पदावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावीत अशी मागणी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश येवले यांनी केली आहे.



दरम्यान राज्य सरकारकडून नवीन आकृतिबंध मंजूर करण्याच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. याला अनेक महिने उलटले तरी अद्याप अहवाल सादर करण्यात आलेला नाही. संवर्गाची पदे मंजूर नसल्यामुळे अनेक महापालिका कर्मचारी पदोन्नती पासून वंचित सुद्धा राहिले आहेत.
Comments
Add Comment

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली

हद्दपार गुंडाने शहरात वास्तव्य करत केला महिलेवर बलात्कार! पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पुणे: पु्ण्यात गुन्हेगारी क्षेत्रातील वाढ नवीन नसली तरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय