GBS बाधित रुग्णाच्या मृत्यूबाबत काय म्हणाली BMC ?

Share

मुंबई : पायांमध्ये अशक्तपणा आल्‍यामुळे बाई यमुनाबाई लक्ष्‍मण नायर रूग्‍णालयात २३ जानेवारी २०२५ रोजी दाखल झालेल्‍या एफ उत्‍तर विभागातील ५३ वर्षीय पुरूष रूग्‍णावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते. श्वसनास त्रास होत असल्‍याने या रूग्‍णाला कृत्रिम जीवनप्रणाली (व्हेंटिलेटर) वर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) ची बाधा झाल्याचे निदान झाले. त्‍यानुसार, रूग्‍णावर योग्य ते उपचार करण्‍यात आले. उपचार सुरू असतानाच सोमवार, १० फेब्रुवारी २०२५ रोजी या रूग्‍णाचे निधन झाले आहे. या रुग्णाला या पूर्वी ताप किंवा अतिसार (Diarrhea) ची लक्षणे नव्हती. केवळ रक्तदाबाची समस्‍या होती. बाई यमुनाबाई लक्ष्‍मण नायर रूग्‍णालयात दाखल होण्याच्या १६ दिवसांपूर्वी हा रूग्‍ण पुणे येथे जाऊन परतला होता, असे निष्‍पन्‍न झाले आहे.

या व्यतिरिक्त सद्यस्थितीत पालघर येथील १६ वर्षीय मुलगी गुइलेन-बॅरे सिंड्रोम बाधेमुळे बाई यमुनाबाई लक्ष्‍मण नायर रूग्‍णालयात दाखल आहे. या रुग्ण मुलीला ताप आला होता. योग्‍य उपचारांमुळे रूग्‍ण मुलीच्‍या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) उपचारांसाठी मुंबईतील सर्व महानगरपालिका रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये सुसज्ज आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधोपचार, साधनसामग्री आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने स्‍पष्‍ट करण्‍यात येत आहे. नागरिकांनी गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरुन जाऊ नये. मार्गदर्शन व उपचाराकरिता जवळच्या महानगरपालिका रुग्णालयास त्वरित संपर्क करावा, असे आवाहनदेखील महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

गुइलेन-बॅरे सिंड्रोमची माहिती:

गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ स्वयंप्रतिकार (Auto immune) स्वरुपाचा विकार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच चेतासंस्‍थांवर (peripheralnervous system) हल्ला करते. यामुळे स्नायू कमजोर होतात आणि गंभीर रुग्णामध्ये पक्षाघातही होऊ शकतो.

गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा संसर्गजन्यरोग नाही. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. याचे निश्चित कारण अज्ञात आहे. हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो. त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.

गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग नवीन नसून, तो अनेक वर्षांपासून ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर तो विकसित होऊ शकतो. तसेच GBS ची इतर अनेक कारणे असतात

गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग वर्षभर आढळतो. साधारणपणे १ लाख लोकांमध्ये एकजण या रोगाने ग्रस्त असतो. त्यामुळे, मुंबईतील मोठी रूग्‍णालये / वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर महिन्याला ‘जीबीएस’ चे काही रुग्ण उपचारासाठी येतात.

गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे :

* अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता / लकवा
* अचानकपणे उद्भवलेला चालण्‍यातील त्रास किंवा अशक्तपणा
* जास्‍त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप

नागरिकांनी घ्यावयाची काळजी :

* पिण्याचे पाणी उकळून प्‍यावे
* स्वच्छ व ताजे अन्न खावे
* शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नये
* वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
* हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

21 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

59 minutes ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago