शिवाजीनगर बसस्थानकाच्या बांधकामाला महाराष्ट्र दिनाचा मुहुर्त; १६ मजल्यांची इमारत उभी राहणार

मुंबई/पुणे : महामेट्रोच्या भूयारी स्थानकामुळे ५ वर्षांपूर्वी वाकडेवाडी येथे स्थलांतरीत झालेल्या शिवाजीनगर बस स्थानकाच्या पूर्वीच्याच जागेवरील नव्या इमारतीच्या बांधकामाला अखेर मुहुर्त मिळाला. महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे नव्या इमारतीचे भूमीपूजन होणार आहे. तळमजल्यावर बसस्थानक व वरील बाजूस सरकारी तसेच खासगी कार्यालयांची १६ मजली इमारत असे नव्या बसस्थानकाचे स्वरूप असेल. या प्रकल्पाचा खर्च तब्बल ६०० कोटी रूपये असून भूमीपूजनानंतर ३ वर्षात त्याचे बांधकाम पूर्ण होईल.


उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये मंत्रालयात बुधवारी सकाळी या स्थानकाच्या संदर्भात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (ऑन लाईन), महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर, नगरविकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी बैठकीला होते.



शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, ती वेळेत आणि दर्जेदार पध्दतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प दर्जेदार होण्याबरोबरच वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वाच्या प्रकल्पांसाठी चांगले विकसक मिळण्यासाठी ९९ वर्षाचा करार करण्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


पुण्याची ओळख असणाऱ्या शिवाजीनगर बसस्थानकाची महामेट्रोने त्याच जागेवर मेट्रोचे भूयारी स्थानक प्रस्तावित केल्यामुळे रयाच गेली. ५ वर्षांपूर्वी हे स्थानक वाकडेवाडीला हलवण्यात आले. तेव्हापासून पुणेकर एसटी प्रवाशांचे हाल होत आहेत.


बसस्थानक पाडले त्यावेळी महामंडळ व महामेट्रो कंपनी यांच्यात करार झाला होता. भूयारी स्थानक बांधून झाल्यानंतर महामेट्रो कंपनी बसस्थानक पूर्वी होते तसेच त्यांच्या खर्चाने बांधून देणार होती. मात्र त्यानंतर त्यांच्यात काही बेबनाव झाला. एसटी महामंडळ प्रशासनात राजकीय हस्तक्षेप होऊन या जागेवर बांधा, वापरा, हस्तांतर करा या तत्वावर व्यापारी संकुल बांधण्याच्या गोष्टी सुरू झाल्या. मात्र दरम्यान सरकारमध्ये बदल झाले, बराच काळ परिवहन मंत्रीच नव्हते, त्यात हे काम रखडले. त्यानंतर पुन्हा सरकार बदलले, त्यातही हा प्रकल्प पुढे गेलाच नाही. नुकत्याच सत्तारूढ झालेल्या नव्या सरकारमध्ये आता या या प्रकल्पाला गती मिळाली असून आता तर भूमीपूजनाचा मुहुर्तच उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर केला आहे.



नव्या शिवाजीनगर बसस्थानकाची वैशिष्ट्ये



  • ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ (पीपीपी- पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्त्वावर बांधकाम

  • खाली बसस्थानक व वर व्यावसायिक संकूल

  • स्थानकाच्याही खाली वाहनतळासाठी दोन तळघर.

  • १६ मजली इमारत

  • ६०० कोटी रूपयांचा खर्च

  • बांधकाम पूर्ण होण्यासाठी ३ वर्षे अपेक्षित

Comments
Add Comment

Akola News : पाडव्याआधीच 'काळाचा घाला'! ऐन दिवाळीत भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघे ठार; अकोल्यात शोककळा

अकोला : संपूर्ण राज्यासह देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह ओसंडून वाहत असताना, अकोल्यात मात्र लक्ष्मीपूजनाच्या

Pune Saras Baug : पुणेकरांच्या उत्साहाला गालबोट; सारस बागेत वादाचे रूपांतर हाणामारीत, पोलिसांची तातडीने मध्यस्थी

पुणे : हिंदुत्त्ववादी संघटनांच्या धमक्यांमुळे यंदा चर्चेत असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग दिवाळी पाडवा

नागपुरात फटाक्यांचा 'धुमाकूळ'! रात्रभरात सहा ठिकाणी आगीच्या घटना; मोठे नुकसान

नागपूर: दिवाळीच्या दिवसांत नागपुरात फटाक्यांची आतषबाजी आणि निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीच्या घटनांनी मोठी

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत.

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली