सुदर्शन घुलेची तीन दिवसाची पुन्हा पोलिस कोठडी

केज : संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला केज कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सीआयडीने त्याच्या पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु कोर्टाने तीन दिवस कोठडी सुनावली. संतोष देशमुख खून प्रकरणात सुदर्शन घुले हा न्यायालयीन कोठडीत होता.


यापूर्वीही एसआयटीने त्याची पोलिस कोठडी घेतली होती. त्याच्या दोन मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी आणि मोबाईल लॉक काढण्यासाठी त्याची कोठडी घेण्यात आलेली होती. त्यानंतर तो पुन्हा न्यायालयीन कोठडीत गेला होता. आता पुन्हा १४ फेुब्रुवारीपर्यंत सुदर्शन सीआयडीच्या कोठडीत असेल.



याअगोदर सुदर्शन घुलेची चौकशी ही खून प्रकरणात झाली होती. परंतु आता खंडणी प्रकरणामध्ये सुदर्शन घुलेची चौकशी होणार आहे. त्याच्या मोबाईलमधील डेटा आणि कॉल डिटेल्स व्हेरिफाय करण्यासाठी त्याचं व्हाईस सॅम्पल घेण्यात येणार आहे. सुदर्शन घुलेवर खंडणी, अपहरण, खून हे तीन गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात वापरलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून तो फरार झाला होता. तसाच तो वाशीला गेला आणि तिथे गाडी सोडून साथीदारांसह पळून गेला. तिथून छत्रपती संभाजी नगर, गुजरात, पुणे असा काही आरोपींनी प्रवास केला.


यादरम्यान ते कुणाकुणाशी बोलले, याचा तपास पोलिसांना करायचा आहे. ते सगळे लोक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सुदर्शन घुलेचे व्हाईस सॅम्पल सीआयडीला हवे आहे. बुधवारी केजच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

Comments
Add Comment

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Education : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जून पासून नवीन अभ्यासक्रम

नागपूर : नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध नाविन्यपूर्ण विकास योजना, पारदर्शकता व प्रशासकीय पातळीवर होणारा

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Nashik Dwarka Chawk : नाशिकमधील हे चौक ३ महिने राहणार बंद; प्रवासाचे वेळेत करा नियोजन

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात आणि TCS कंपनी नंतर नाशिक आणखी एक कारणाने चर्चेत आहे ते म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा या

Ayan Ahmed and Uzer : अयान अहमद व उजेरमध्ये होता पैशाचा वाद

अमरावती : परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू झाल्यानंतर आता तपासात नवनवीन तथ्ये पुढे

Dagdudsheth Mandir : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला रविवारी ११ हजार