Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीKonkan Railway : चाकरमान्यांचे हाल! 'या' कोकण रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले

Konkan Railway : चाकरमान्यांचे हाल! ‘या’ कोकण रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले

नेमकं कारण काय?

मुंबई : कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई लोकलबाबात अभियांत्रिक व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. दरम्यान, आज कोकण रेल्वे मार्गावरील रोहा येथे ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) वाहतुकीवर परिणाम होणार असून रेल्वे उशिराने धावणार आहेत. (Konkan Railway Megablock)

Gold Rate Today : सोन्याच्या दरात तेजी सुरुच! जाणून घ्या काय आहे आजचा भाव

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रोहा यार्डमधील अप मार्गावरील पॉइंट क्रमांक १२६ ब आणि १२७ एच्या ओव्हरराइडिंग स्विच बदलण्याचं काम केलं जाणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोकण रेल्वे पूर्वपदावर येण्यासाठी पुढील काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी वेळापत्रक पाहून कोकण प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Konkan Railway Megablock)

कोणत्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल?

  • १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
  • १६३४६ तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस
  • १२६१७ एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस
  • १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -